आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाने ज्या चित्रपटासाठी सलमानचा \'भारत\' सोडला, त्या चित्रपटाचे भवितव्य धोक्यात?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: प्रियांका चोप्राने सलमान खानचा 'भारत' चित्रपट सोडल्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आले. याच काळात अजून एक वृत्त आले आहे की, प्रियांकाने जो हॉलिवूड चित्रपट साइन केला होता, तो आता पोस्टपोन झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाना काही दिवसांपुर्वी 'काउब्वॉय निंजा वाइकिंग' हा चित्रपट साइन केला होता. यामध्ये तिच्यासोबत अॅक्टर क्रिस प्रॅटही काम करणार होता. परंतू फिल्ममेकर्सने (यूनव्हर्सल फिल्म) सध्या रिलीज कॅलेंडरमधून चित्रपटाचे नाव काढून टाकले आहे. पहिले हा चित्रपट 28 जून, 2019ला रिलीज होणार होता. 


प्रियांकाला रीशेड्यूल कराव्या लागतील डेट्स 
प्रियांकाच्या चाहत्यांना दिलासा देणारी एक गोष्ट आहे. ती म्हणजे हा चित्रपट कँन्सल केला गेलेला नाही. परंतू आता चित्रपट रिलीज होण्यास जास्त काळ लागू शकतो. हॉलिवूड चित्रपट अशा प्रकारे अडकल्यामुळे प्रियांकाला अडचणी येऊ शकतात. आता नवीन शेड्यूल असल्यामुळे दूस-या अॅक्टर्सला नवीन डेट्स द्याव्या लागतील. अशा वेळी प्रियांका जवळ नवीन डेट्स असतात की, नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण सप्टेंबरमध्ये प्रियांका आणि तिचा बॉयफ्रेंड निक जोनासच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. 

 

प्रियांकाने खोटे बोलून सोडला होता सलमानचा चित्रपट 
सलमानने लव्हरात्रीच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सांगितले होते की, "प्रियांकाने मला सांगितले की, ती लग्नाची प्लानिंग करतेय. यामुळे ती माझा चित्रपट करु शकत नाही. मी म्हटले काही हरकत नाही. तिने मला चित्रपट सोडण्याचे हे कारण सांगितले, नंतर हे चुकीचे आहे असे कळाले. पण काहीही असतो, तिने कोणत्याही कारणामुळे चित्रपट सोडला असला तरी मी तिच्या सपोर्टमध्ये आहे. जर तिला सलमानसोबत काम करायचे नसेल तर काहीच हरकत नाही. ती दूस-या हॉलिवूड अॅक्टरसोबत काम करु शकते."

 

 

बातम्या आणखी आहेत...