आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इव्हेंटमध्ये पतीसोबत ग्लॅमरस अंदाजात पोहोचली प्रियांका, दिसला दोघांचा रोमँटिक अंदाज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता हॉलिवूडमध्ये स्थिरस्थावर झालेली प्रियांका चोप्रा लग्नानंतर आता आपला जास्तीत जास्त वेळ परदेशात सासरी घालवत आहे. येथे ती पती निक जोनाससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतेय. अलीकडेच दोघांचे काही फोटोज समोर आले आहेत. त्यांचे हे फोटोज शुक्रवारी लॉस एंजिलिस येथे पार पडलेल्या JBL Fest इव्हेंटचे आहेत. फोटोजमध्ये प्रियांका ब्लॅक कलरच्या हाय स्लिट गाऊमध्ये हॉट अंदाजात दिसतेय. महरुन लिपस्टिक, मेकअप आणि मोकळे केस ठेऊन तिने तिचा हा लूक परफेक्ट केला. तर निक फॉर्मल सूटमध्ये हॅण्डसम दिसला. 

दोघांनी एकमेकांचा हात हातात घेऊन एकत्र पोज दिल्या. या कपलचे हे लेेटेस्ट फोटो सोशल साइटवर व्हायरल होत आहेत. या लव्ह बर्ड्सचा रोमँटिक अंदाज बघण्यासारखा होता. प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या इव्हेंटमधला दोघांचा फोटो शेअर केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...