आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क - प्रियांका चोप्राने आपल्या वाढदिवशी (18 जुलै) रोजी आपला प्रियकर निक जोनासशी गुपचूप साखपुडा केला होता. परंतु, आज संध्याकाळी (शनिवार) ते पुन्हा रुढी परमपरेनुसार साखरपुडा करत आहेत. इंगेजमेंटमध्ये दोघांनी एकमेकांच्या कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींसमोर रिंग एक्सचेंज केल्या. रोका सेरेमनी प्रियांकाच्या मुंबई जुहू येथील घरी पार पडली. प्रियांकाची चुलत बहीण परिणीति चोप्रा सुद्धा यात सहभागी झाली.
साखरपुड्यानंतर पार्टी
> प्रियांका-निकची एंगेजमेंट झाल्यानंतर पाहुण्यांसाठी लंचची व्यवस्था करण्यात आली आहे. लंच मेन्यूमध्ये पंजाबी डिशेस ठेवण्यात आल्या आहेत. निकच्या आवडीचे भान ठेवून दाल मखनी आणि बटर चिकन सुद्धा आहे. लंच पार्टी सुद्धा प्रियांकाच्या घरीच आहे. प्रियांका-निकच्या साखरपुड्याचे संपूर्ण अरेंजमेंट निकच्या आवडीनुसार करण्यात आले असे सांगितले जात आहे.
> एंगेजमेंट पार्टीत सामिल होणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रियांका-निकने नियम बनवले आहेत. ते सर्वांनाच फॉलो करावे लागेल. त्यानुसार, कुणीही आपल्यासोबत मोबाईल घेऊन येणार नाही. तसेच दोघांचा एकही फोटो क्लिक करणार नाहीत. आपल्या एंगेजमेंटचे फोटो लीक व्हावे अशी त्यांची इच्छा नाही.
> तरीही जुहू बंगल्याच्या इव्हेंटचे फोटो लीक झाले. प्रियांकाच्या जुहू येथील घराला मांडवाचे स्वरूप देण्यात आले आहे. त्याची अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. आपल्या या खासगी कार्यक्रमात दोघांनी फक्त मोजक्या लोकांनाच बोलावले आहे.
1.40 कोटींची एंगेजमेंट रिंग
प्रियांका चोप्राच्या वाढदिवसाचे निमित्त साधून निकने तिला एंगेजमेंट रिंग घातली आहे. या रिंगची किंमत तब्बल 1.40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये प्रियांका सहभागी झाली होती. त्यावेळी तिच्या हातातील अंगठीने सर्वांचे लक्ष वेधले. सर्वच ठिकाणी या अंगठीवर चर्चा झाल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.