आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: शनिवारी 18 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनाची रोका सेरेमनी पार पडली. यानंतर सेलेब्ससाठी प्रियांकाच्या घरी पार्टी होस्ट करण्यात आली. पार्टीचा एक इनसाइड व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रियांका मनसोक्त डान्स करताना दिसतेय. प्रियांका साखरपुड्याच्या पार्टीमध्ये इंग्रजी गाण्यांवर थिरकताना दिसतेय तर होणारा नवरा निक जोनास तिचा व्हिडिओ बनवताना दिसतोय. व्हिडिओमध्ये प्रियांका आपली मैत्रिण अनुषा दांडेकरसोबत डान्स करतेय.
- पार्टीमध्ये सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा, प्रियांकाचे मित्र आणि कोरिओग्राफर मुश्ताक शेख, डायरेक्टर विशाल भारव्दाज आणि वीजे अनुषा दांडेकर पोहोचले.
अमिताभ नाही अन् ऐश्वर्याही नाही
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अऩिल कपूरोसोबतच बॉलिवूडमधील सेलेब्स आपल्या कलीग्सला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचत असतात. परंतू यावेळी येथे कुणीही उपस्थित नव्हते.
- शनिवारी मीडियामध्ये एक लिस्ट आली होती. यामध्ये फरहान अख्तर, सिध्दार्थ रॉय कपूर, रणवीर सिंह, कंगना रनोट, आलिया भट, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अनुराग कश्यप आणि संजय लीला भन्साळींचे नाव इनव्हायटेड लोकांच्या लिस्टमध्ये होते. परंतू यामधून फक्त आलिया आणि भन्साळी या पार्टीमध्ये दिसले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.