आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Photo / गळ्यात मंगलसूत्र, भांगात कुंकू आणि हातात लाल चुडा, नववधूच्या रुपात पती निकसोबत दिसली प्रियांका चोप्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः 2 डिसेंबर रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेस येथे झालेल्या लग्नानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत प्रियांकाच्या भांगात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातावर मेंदी लावलेली दिसतेय. नववधूच्या रुपात प्रियांका अतिशय सुंदर दिसली. तिने यावेळी साडी परिधान केली होती. प्रियांका आणि निक यांचे ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने लग्न लागले.


दोन्ही कुटुंबीय पोहोचले मुंबईत...
लग्नानंतर प्रियांका आणि निक यांचे कुटुंबीय जोधपूरहून मुंबईत दाखल झाले आहे. प्रियांका आणि निक यांचे येत्या 4 डिसेंबर रोजी दिल्लीत वेडिंग रिसेप्शन होणार आहे. तर मुंबईतील रिसेप्शनची तारीख अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही.


एअरपोर्टवर स्पॉट झाले गेस्ट...
लग्नात सहभागी झालेले हॉलिवूड स्टार्स आणि जोनसर ब्रदर्स एअरपोर्टवर स्पॉट झाले. याशिवाय परिणीती चोप्रा, प्रियांकाचे काका-काकू पवन आणि रीना चोप्रा, जो आणि डेनियल जोनस प्रियांका-निकसोबत मुंबईत परतले.

बातम्या आणखी आहेत...