Home | Gossip | Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized

दोनदा हनीमूनवर जाणार आहे प्रियांका चोप्रा, पहिल्यांदा लहान आणि दुस-यांदा मोठे व्हेकेशन करणार प्लान, दुस-या रिसेप्शनची तारीख केली जाहीर, कतरिना-आलिया आणि दीपिकासह या सेलेब्सनी दिल्या शुभेच्छा : Photos

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 12:23 PM IST

मीनारच्या डिझाइनचा होता 6 टियर असलेला 18 फूटांचा वेडिंग केक : First Photo

 • Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized

  एंटरटेन्मेंट डेस्कः मंगळवारी दिल्लीत प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन पार पडले. रिपोर्ट्सनुसार, आता दुसरे रिसेप्शन मुंबईत 15 किंवा 16 डिसेंबर रोजी होणार आहे. हे रिसेप्शन प्रियांका तिच्या बॉलिवूड फ्रेंड्ससाठी ठेवत आहे. या पार्टीनंतर निकयांका एका लहान हनीमूनवर जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे कपल 27 डिसेंबर रोजी हनीमूनला रवाना होणार आहे. दोघे कुठे जाणार याविषयी मात्र गुप्तता बाळगण्यात येणार आहे.

  जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतणार प्रियांका...
  - प्रियांका चोप्राच्या आगामी 'द स्काई इज पिंक' या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अद्याप शिल्लक आहे. जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग शेड्युल अहमदाबाद येथे आहे. शूटिंग संपल्यानंतर प्रियांका आणि निक लांब सुटीवर जाणार आहेत.


  - प्रियांका तिची आई मधू चोप्रासोबत 6 डिसेंबर रोजी त्यांच्या प्रॉडक्शनचा चित्रपट 'पहुना'च्या निमित्ताने सिक्किमला जाणार आहे. नेपाळी भाषेतील या चित्रपटाच्या मधू चोप्रा आणि प्रियांका निर्मात्या आहेत.

  - मंगळवारी निकयांका यांच्या ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले होते. हे फोटोज पीपल्स या इंटरनॅशनल मॅगझिनने प्रकाशित केले होते. रिपोर्ट्सनुसार, या मॅगझिनसोबत प्रियांकाने लग्नाच्या कव्हरेजचा करार केला होता. हा करार 17 कोटींत झाला होता.

  स्पेशल होता ख्रिश्चन वेडिंगचा केक...

  ख्रिश्चन वेडिंगवेळी प्रियांका आणि निक यांनी 18 फूट उंच 6 टियर असलेला केक कापला होता. हा केक अतिशय सुंदररित्या सजवण्यात आला होता. केक मीनारच्या डिझाइनचा होता. याच्या बेसमध्ये व्हाइट कलरच्या छोट्या छोट्या खिडक्या होत्या. एका खिडकीत प्रियांका निकच्या नावाचे आद्याक्षर एनपी लिहिले होते. त्याच्याशेजारी गोल्डन कलरचे पीलर होते. केकच्या टॉपवर गोल्डन कलरचे सहा पिलर आणि मध्यभागी झुमर होते. वेडिंग केक बनवण्यासाठी निकने स्पेशली दुबई आणि कुवैत येथून शेफला बोलावले होते. केक रेडी करण्याूपर्वी शेफने भारतील रेस्तराँमध्ये जाऊन यामध्ये उपयोगात येणारे सामान आणि केक तयार करण्याची विधी जाणून घेतली होती. केकचे फोटो पीपल या मॅगझिनने प्रकाशित केले आहेत.


  बॉलिवूड सेलेब्सनी दिल्या निकयांकाला शुभेच्छा...
  कतरिना कैफ, आलिया भट, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अनुष्का शर्मा, भूमी पेडनेकर, प्रीती झिंटा, सोनाली बेंद्रेसह अनेक सेलिब्रिटींनी नवविवाहित दाम्पत्याला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 • Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized
 • Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized
 • Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized
 • Priyanka Chopra & Nick Jonas Honeymoon plan and Mumbai reception date finalized

Trending