आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Nick Love Story: Priyanka Brother In Law Joe Jonas Reveals How She Knocked Nick Jonas Off His Feet

अशी सुरु झाली प्रियांका आणि निकची लव्ह स्टोरी..दुसऱ्या भेटीतही झाले नाही कीस, निकने प्रपोज केले तेव्हा 45 सेकंद शांत होती प्रियांका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा २९ नोव्हेंबर रोजी मेंदी आणि संगीत से‍रेमनी  झाली. निकयांकाने आपले फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी शुक्रवारी (३० नोव्हेंबर) एका कॉकटेल पार्टीचे आयोजन केले विवाह समारंभासाठी वधूवरांसोबत सर्व पाहुणे जोधपूर येथील उम्मैद भवनमध्ये पोहोचले.

 

दुसरीकडे, निकयांकाने वोग मॅगझीनला दिलेली मुलाखत व्हायरल होत आहे. मुलाखतीत निकयांकाने त्यांच्या लव्ह स्टोरीवर प्रकाश टाकला आहे. याच मॅगझिनच्या जानेवारी एडिशनसाठी प्रियांकाने फोटोशूटही केले होते.


दुसऱ्या भेटीतही नव्हते झाले प्रियांका-निकमध्ये कीस..
-वोग मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीनुसार, सर्वात अगोदर निकने प्रियांकाची सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स हिला मॅसेज पाठवला होता. त्यात लिहिले होते की, "प्रियांका खूप सुंदर आहे." 
- सप्टेंबर 2016 मध्ये पहिल्यांदा निकने प्रियांकाला 'ट्विटर'वर मॅसेज केला होता. त्या मॅसेजमध्ये निकने लिहिले होते, 'आपल्या काही कॉमन फ्रेंड्सचे म्हणणे आहे की, आपण भेटायला हवे.'
- यावर प्रियांकाने लिहिले होते की, हा मॅसेज त्यांची संपूर्ण टीम वाचू शकते. त्यामुळे त्याने तिच्या फोनवर संपर्क साधावा.
- मॅगझीननुसार 2017 मध्ये प्रियांका आणि निक यांना डिझाइनर राल्फ लॉरेन (Ralph Lauren) याने मेट गाला येथे आमंत्रित केले होते. यापूर्वी ते दोघे न्यूयॉर्क येथे एका ड्रिंक पार्टीमध्ये भेटले होते. 
- या भेटीनंतर प्रियांकाने निकला आपल्या घरी बोलावले होते. घरी तिची आई मधू चोप्रा या टीव्ही सीरिअल "लॉ अॅण्‍ड ऑर्डर" बघत होत्या. प्रियांकाने सांगितले. "आम्ही काही तास गप्पा मारल्या. त्यावेळी आमच्यात कीस झाले नव्हते." 


ग्रीसमध्ये केले होते निकने प्रपोज.. 
- तिसऱ्या भेटीतच निकला समजले होते की, प्रियांका हिच ती मुलगी आहे, जिच्याशी त्याला लग्न करायचे आहे. तरी देखील निकने प्रियांकाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रपोज केले नाही. 
- निकने त्यावेळी एका आठवड्यापूर्वीच अंगठी खरेदी केली होती. गुढघ्यांवर बसून निक प्रियांकाला म्हणाला, "मी ही अंगठी तुझ्या बोटात घालू शकतो का? तुझ्याशी लग्न करून मी या जगातला सर्वात नशीबवान व्यक्ती बनूशकतो का?" निक बोलत असताना प्रियांका 45 सेकंद स्तब्ध उभी होती. नंतर प्रियांकाने निकच्या प्रेमाचा स्वीकार केला.
- निकच्या भावाने एका मुलाखतीत सांगितले. पहिल्यांदा जेव्हा मेट गाला अवॉर्ड्समध्ये निकने प्रियांकाला पहिले तेव्हाच तो 'क्लीन बोल्ड' झाला होता. त्याची अवस्था एखाद्या कुत्र्याच्या पिल्लासारखी झाली होती. हे पाहून मी आणि सोफी खूप हसलो होतो. 

 

निक याला प्रेमाने 'या' नावाने बोलावते प्रियांका.. 
- प्रियांकाने सांगितले की, तिने निक याला एक निक नेम दिले आहे आणि ती त्याच नावाने त्याला हाक मारते. प्रियांका निक याला "ओल्ड मॅन जोनस" अशी हाक मारते.
- प्रियांका निक याला या नावाने का हाक मारते, याचे कारणही तिने मुलाखतीत सांगितले होते. ती एकदा निकसोबत  लॉस अँजेलिसला गेली होती. तेव्हा निक तिला म्हणाला होता की, "तू ज्या नजरेने जगाकडे पहाटे ते मला खूप आवडते. मला तुझा तो दृष्टिकोन खूप आवडतो." 
- प्रियांका म्हणते की, "एक मुलगी म्हणून मला सांगावेसे वाटते की, मला आजपर्यंत अशी कोणतीच व्यक्ती भेटली नाही, तिला माझे महत्वाकांक्षी असणे आवडते. नेहमी याविरुद्धच घडते." यावरूनच कळते की, निक हा प्रियांकाच्या स्वभावाचा किती आदर करतो.

 

3 डिसेंबरपर्यंत चालतील प्रियांका-निकचे लग्नविधी.. 
-  प्रियांका-निक यांचा मेंदी आणि संगीतचा कार्यक्रम 29 नोव्हेंबर रोजी जोधपूर येथील उम्मैद भवनमध्ये झाला तर 30 नोव्हेंबर रोजी निकयांका हे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी एका कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते. 1 डिसेंबर रोजी प्रियांका-निकचा हळदीचा कार्यक्रम झाला. 
- निकयांका दोन पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. 2 डिसेंबरला हिंदू आणि ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने हे लग्न होणार आहे. हिंदू परंपरेप्रमाणे होणाऱ्या लग्नविधीसाठी प्रियांका डिसाईनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तयार केलेला ड्रेस तर ख्रिश्चन परंपरेने होणाऱ्या लग्नविधीसाठी ती डिझाइनर राल्फ लॉरेन (Ralph Lauren) यांनी तयार केलेले ड्रेस परिधान करणार आहे. 
- निकयांकाच्या लग्नात मित्र-मैत्रिणी आणि घरची मंडळी मिळून एकूण 80 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नामध्ये प्रियांकाने कोणत्याही बॉलीवूड कलाकाराला आमंत्रण दिलेले नाही. लग्नानंतर 2 रिसेप्शन दिले जातील. त्यापैकी एक रिसेप्शन 4 डिसेंबरला दिल्ली येथे, दुसरे मुंबई येथे दिले जाईल. या रिसेप्शनमध्ये सर्व बॉलीवूड कलाकारांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...