आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा येत्या 2-3 डिसेंबर रोजी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत विवाहबद्ध होणार आहे. जोधपूर येथील उमैद भवन पॅलेसमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नापूर्वी प्रियांकाला एक सरप्राइज पार्टी मिळाली. ही पार्टी 'द स्काई इज पिंक'च्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मिळून होस्ट केली होती. पार्टीत देसी गर्लचा भावी पती निक जोनाससुद्धा सामिल झाला होता.
पूर्ण झाले चित्रपटाचे चित्रीकरण...
- प्रियांका गेले काही दिवस 'द स्काई इज पिंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने दिल्लीत होती. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिच्यासाठी सरप्राइज पार्टी आयोजित करण्यात आली. पार्टीत दिग्दर्शिका शोनाली बोस, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
- पार्टीत प्रियांका आणि निक यांनी केक कापला. या पार्टीत सिद्धार्थ रॉय कपूर यांनी शॅम्पनेची बाटली खोलली. चित्रपटाच्या सेटवरील या सेलिब्रेशनचे काही फोटोज समोर आले आहेत. फोटोजमध्ये प्रियांका अतिशय आनंदी दिसतेय.
खास होता केक...
पार्टीत प्रियांकासाठी एक खास केक मागवण्यात आला होता. या केकवर पीसीच्या नावाने प्रसिद्ध प्रियांकाचे नाव PCJ लिहिले होते. केकवरील या नावावरुन प्रियांका लग्नानंतर आपल्या नावासोबत जोनास हे नाव लावणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन पद्धतीने होणार लग्न...
निकयांका दोन पद्धतीने लग्न थाटणार आहेत. 2 डिसेंबर रोजी हिंदू आणि 3 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघे लग्न करणार आहेत. लग्नापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निक बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणार आहे. प्रियांकाच्या चित्रपटातील गाणे 'गल्ला गुडियां..', 'देसी गर्ल..' 'पिंगा..' या गाण्यावर निक थिरकणार असल्याचे समजते. याशिवाय तो त्याच्या टीमसोबत 45 मिनिटांचे गाण्यांचे सादरीकरणही करणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी निकयांकाने त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले आहे.1 डिसेंबर रोजी निक आणि प्रियांका यांना हळद लागणार आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, या सरप्राइज पार्टीचे फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.