आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Nick Jonas Shared Unseen Wedding Pictures On Their First Wedding Anniversary

प्रियांका निकला म्हणाली - मला शोधण्यासाठी धन्यवाद, शेअर केले लग्नाचे अनसीन फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी 1 डिसेंबर रोजी गायक निक जोनाससोबत प्रियांका विवाहबद्ध झाली होती. जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या लग्नाचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर करुन एकमेकांना अनोख्या पद्धतीने लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. 

  • प्रियांकाने दिले अनोखे कॅप्शन...

प्रियांकाने लग्नातील फोटो शेअर केले. सोबत कॅप्शन दिले, - ''माझे वचन.. तेव्हा.. आज.. कायमसाठी. तू मला एका क्षणात आनंद, उत्साह... सर्वकाही दिले. मला शोधण्यासाठी धन्यवाद... हॅपी फर्स्ट वेडिंग एनिव्हर्सरी हसबंड... सोबतच त्या प्रत्येकाला धन्यवाद ज्यांनी आम्हाला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद दिले. आम्ही अतिशय आनंदी आहोत.''

  • मनापासून तुझ्यावर प्रेम करतो...

निक जोनसनेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या लग्नातील एक फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले - ''वर्षभरापूर्वी आपण एकमेकांचे झालो. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो, प्रियांका लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' 

प्रियांकाला माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सन्मानित केले जाणार आहे. हा सन्मान प्राप्त करणारी प्रियांका पहिली भारतीय कलाकार ठरली आहे. हा सन्मान सोहळा जेमा एल फना स्वेअर येथे होणार आहे. तर दुसरीकडे निक जोनस आणि जोनस ब्रदर्सच्या 'सकर फॉर यू..' या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्स 2019 मध्ये नामांकन मिळाले आहे.