आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या लग्नात 4 कोटी रुपये खर्च करणार प्रियांका चोप्रा, अखेरच्या क्षणी बदलण्यात आले मेंदी आणि आणि संगीत सेरेमनीचे स्थळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. प्रियांका चोप्रा आपल्या 10 वर्षे लहान बॉयफ्रेंड निक जोनाससोबत 2-3 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार देसी गर्लच्या लग्नात जवळपास 4 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. प्रियांकाच्या लग्नाचे फंक्शन 5 दिवस सुरु राहणार आहेत. 29 ला देसी गर्लची संगीत आणि मेंदी सेरेमनी होणार आहे. यापुर्वी मेहरानगड फोर्टमध्ये मेंदी सेरेमनी होणार होती, पण आता एक दिवसांपुर्वीच प्रियांकाला बुकिंग कॅन्सल करावी लागली आहे. 

 

प्रियांकाला सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त हवा होता 
- लग्नाचे काही फंक्शन्स मेहरानगढ येथे व्हावे आणि येथीन भवन पॅलेसमध्ये जाण्यासाठी राजस्थान पोलिसांनी सुरक्षा द्यावी असे प्रियांकाला वाटत होते. पण राजस्थानमध्ये निवडणूक असल्यामुळे पोलिस सुरक्षा देऊ शकणार नाही. 
- प्रियांकाने आपल्या पर्सनल सिक्योरिटीचा बंदोबस्त केला आहे पण तिला राजस्थान पोलिसांचीही मदत हवी होती. पण आता असे होऊ शकणार नाही. यामुळे आता सर्व फंक्शन्स इमेद भवन पॅलेसमध्ये होणार आहेत.

 

लग्नावर करणार 4 कोटींचा खर्च 
प्रियांका आणि निकच्या लग्नासाठी 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत सर्व हॉटेल बुक करण्यात आली आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार हॉटेल मॅनेजमेंटने या दिवसांच बुकिंग कन्फर्म केली आहे. या दरम्यान दूस-या कुणालाही हॉटेलमध्ये रुम दिली जाणार नाही. यासोबतच पॅलेस टूरिस्ट्ससाठी बंद करण्यात आले आहे. 

- संपुर्ण हॉटेलचा 1 दिवसाचा खर्च जवळपास 64.40 लाख रुपये आहे. प्रियांकाने 5 दिवसांसाठी हॉटेल बुक केली आहे. यासाठी जवळपास 3.2 कोटी खर्च येईल. यामध्ये केटरिंगचा खर्च जोडल्यास संपुर्ण लग्नात 4 कोटी रुपये खर्च होतील. 
- रिपोर्ट्सनुसार प्रियांका लग्नात लाल रंगाचा लहेंगा घालणार आहे आणि निक गोल्डन कलरच्या आउटफिटमध्ये दिसेल. 

 

पाहूण्यांना देणार रिटर्न गिफ्ट 
मीडिया रिपोर्डट्नुसार प्रियांका आणि निक आपल्या लग्नात सहभागी होणा-या पाहूण्यांना रिटर्न गिफ्टही देणार आहेत. मिड डेच्या रिपोर्टनुसार दोघांनी मुंबईच्या एका ज्वेलरकडून चांदीचे नाणे डिझाइन केले आहे. या नाण्याच्या एकाबाजूने निक आणि प्रियांकाच्या नावाचे पहिले अक्षर असणार आहे. म्हणजे एकाबाजून NP आणि दूस-या बाजूने गणेश-लक्ष्मीचा फोटो आहे.

 

हेलिकॉप्टरने पोहोचणार गेस्ट 
प्रियांका-निक जोधपुर एयरपोर्टवरुन उमैद भवन पॅलेसपर्यंत हेलिकॉप्टरमध्ये जातील. यासोबतच लग्नात सहभागी होणारे गेस्टही जोधपुर एयरपोर्टवरुन हेलीकॉप्टरने डायरेक्ट वेडिंग वेन्यूपर्यंत पोहोचणार आहेत. पॅलेसमध्ये एक हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. मेवाड हेलिकॉप्टर सर्व्हिसव्दारे हे कन्फर्म करण्यात आले आहे. 


2 रिसेप्शन होणार 
लग्नानंतर निक-प्रियांकाचे 2 रिसेप्शन होतील. एक रिसेप्शन दिल्लीमध्ये 4 डिसेंबरला होईल. तर दूसरे रिसेप्शन मुंबईमध्ये असणार आहे. मुंबईमध्ये होणा-या रिसेप्शनची तारीख अजून समोर आलेली नाही. 
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...