आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेद भवन पॅलेस : विदेशातून मागविण्यात आले लाकूड, दगड आणण्यासाठी पसरवली होती रेल्वे लाइन, अशाप्रकारे उभारण्यात आला जगातील शेवटचा पॅलेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - 2 डिसेंबर रोजी बॉलीवुडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा प्रियकर निक जोनस सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. दोघांचेही नातेवाईक आणि परिवार जोधपूरमध्ये आहे. त्यामुळे प्रियांकाचे लग्न 2 डिसेंबरला जोधपूर येथील 'उमैद भवन पॅलेस'मध्ये राजेशाही थाटामाटात पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाचे काका काकू म्हणजेच परिणीती चोप्राचे आई-वडील तिचे कन्यादान करणार आहेत. उमैद भवन पॅलेस मारवाड राजघराण्याचे जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान आहे. आता यातील काही भाग हॉटेलमध्ये बदलण्यात आला आहे. असा भव्यदिव्य पॅलेस बांधण्यासाठी बर्मा येथून लाकूड आणले होते. तर दगड आणण्यासाठी रेल्वे लाइन टाकण्यात आली होती. आज आम्ही आपल्याला या महालाविषयी सांगत आहोत. 

 

हे होते पॅलेस बांधण्यामागचे कारण
> मारवाड प्रदेश आणि दुष्काळ यांचे फार जूने नाते आहे. याठिकाणी तीन वर्षाच्या दुष्काळानंतर एका वर्षासाठी पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे येथील लोक रोजगारासाठी स्थलांतर करत होते. अशातच 1930च्या दशकात पडलेल्या भयंकर दुष्काळादरम्यान तत्कालीन महाराजा उमेदसिंहने लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी उमैद भवन उभारण्यास सुरूवात केली. चौदा वर्ष चाललेल्या या बांधकामात तीन हजार लोकांना प्रत्यक्ष आणि हजारो लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार प्राप्त झाला होता. 

 

पॅलेस उभारण्यासाठी आला इतका खर्ज
> जगातील अप्रतिम हॉटेलचा पुरस्कार मिळवलेल्या उमैद भवनच्या निर्मितीसाठी त्याकाळी फक्त दीड कोटी रूपये खर्च आला होता. उमेद भवनच्या कमी खर्चाचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेली बहुतांश स्थानिक सामग्री होती. त्याकाळी स्थानिक मालमत्तेवर राजघराण्याचा अधिकार होता. त्यामुळे त्यांना यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज पडली नाही. 


दगड पोहोजविण्यासाठी पसरवली रेल्वे लाइन
> या पॅलेसच्या निर्माणासाठी जोधपूरच्या छीतर दगडांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी महाराजाने सूरसागर जवळील फिदुसर येथील विशेष खाणीतील दगड वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या खाणीला आजही राजखाण म्हणून ओळखले जाते. त्याकाळी दगड वाहतूकीसाठी खास व्यवस्था नव्हती. अशातच फिदुसर ते महालाच्या निर्माणस्थानापर्यंत 12 मैल लांब मीटर गेज लाइन टाकण्यात आली होती. त्यावरून दगड वाहण्यासाठी विशेष प्रकारच्या डब्ब्यांची निर्मीती केली होती. याप्रकारे दररोज दगड भरलेली एक रेल्वे निर्माणस्थानापर्यंत पोहोचविण्यात येत होती. 


बर्मा येथून मागविण्यात आले लाकू़ड
उमैद भवनाच्या बांधकामासाठी म्यानमार मधील बर्मा येथील विशिष्टप्रकारचे लाकूड मागविले होते. कारागिरांनी मोठ्या संख्येने अनेक वर्षांपर्यंत खिडकी आणि दरवाजांची निर्मिती केली. यासाठी 20 हजार घनफूट लाकूड वापरण्यात आले. त्याकाळी लाकडाचे हे काम करण्यासाठी साठ हजार रूपये खर्च आला होता. सध्याच्या काळात हीच किंमत कोटींच्या घरात आहे.  

 

संपूर्ण शहरापेक्षा तीनपट जास्त वीजेचा वापर
> उमैद भवनाला प्रकाशित करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे दहा लाख मीटर वायर पसरवलेले आहे. त्याकाळात याला प्रकाशित करण्यासाठी अडीच हजार किलोवॅट विजेची आवश्यकता होती. तर 1943 मध्ये जोधपुरचा विजेचा खप उमेदच्या फक्त एक तृतीअंश होता.


सोनेरी कुलूप उघडून केले होते उद्घाटन
> उमाद भवनचे उद्घाटन 13 फेब्रुवारी 1943 रोजी महाराजा उमैद सिंह यांचा मुलगा हनवंत सिंह यांच्या विवाहदिनी करण्यात आले होते. महाराजांचा सात वर्षीय धाकटा मुलगा दुलीप सिंह याने मुख्य प्रवेशद्वारावरील सोन्याचे कुलूप उघडून भवनाचे उद्घाटन केले होते.  

बातम्या आणखी आहेत...