आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी भावी पतीसोबत पूजेसाठी आईच्या घरी पोहोचली देसी गर्ल, ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली प्रियांकाची अमेरिकेतील सासरची मंडळी : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत विवाहबद्ध होणार आहे. येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. बुधवारपासून प्रियांका आणि निक यांच्या लग्नाचे फंक्शन सुरु झाले आहेत. पीसीची आई मधू चोप्रा यांनी त्यांच्या घरी मुलगी आणि होणा-या जावयासाठी एक खास पुजा ठेवली होती. या पूजेत प्रियांकासह निक आणि त्याचे दादा-वहिनी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसले. यावेळी प्रियांका ब्लू कलरच्या सलवार सूटमध्ये दिसली. तर निकने पिंक कलरचा कुर्ता आणि व्हाइट पायजामा घातला होता.


आईसोबत परफॉर्म करणार प्रियांका... 
प्रियांका तिच्या लग्नाच्या संगीत सेरेमनीत आई मधू चोप्रासोबत धमाकेदार परफॉर्मन्स देणार आहे. दोघी एका स्पेशल गाण्यावर नृत्य करणार आहे. प्रियांका तिचा भावी पती निकसोबतही परफॉर्म करणार आहे. संगीत सेरेमनीची कोरिओग्राफी कोरिओग्राफर गणेश हेगडे करत आहे.

- रिपोर्ट्सनुसार, निकने संगीत सेरेमनी खास बनवण्यासाठी स्पेशल प्लानिंग केले आहे. निक हॉलिवूड आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणार आहे. तो प्रियांकाच्या चित्रपटातील गाणी 'गल्ला गुडियां..', 'देसी गर्ल..' 'पिंगा..'  या गाण्यांवर परफॉर्मन्स देणार आहे. निक हिंदी गाणी गाणारदेखील आहे. तो त्याच्या ट्रूपसोबत 45 मिनिटांचे सादरीकरण करणार आहे.

 

80 गेस्ट होणार सहभागी
निकयांकाच्या लग्नात फ्रेंड्स आणि फॅमिली मिळून एकुण 80 पाहुणे सहभागी होणार आहेत. लग्नात प्रियांकाने बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित केलेले नाही. 
- लग्नानंतर निकयांका 2 रिसेप्शन देणार आहेत. एक रिसेप्शनल 4 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. तर मुंबईतही एक रिसेप्शन असून यात बॉलिवूडचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. अद्याप मुंबईत होणा-या रिसेप्शनची तारीख जाहिर करण्यात आलेली नाही.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा फोटोज...  

 

 

बातम्या आणखी आहेत...