आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका चोप्रा या वर्षी ९ चित्रपटांची निर्मिती, सोबतच पुस्तकाचे लिखाण, चित्रपटांचे शुटींग यांसह आणखी बरच काही करतेय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेंन्मेंट डेस्क -  या वर्षात ती ९ चित्रपटांची निर्मिती करीत आहे. एक पुस्तक लिहीत आहे. दाेन माेठ्या चित्रपटांत भूमिका करत आहे. दाेन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून त्यावरही लक्ष ठेवणार आहे. अनेक ब्रँडच्या जाहिरातींसाठी चित्रीकरणही करायचे आहे. युनिसेफची ब्रँड अॅम्बेसेडर असल्याने अनेक देशांचे दाैरेही करायचे आहेत. आपण हे सर्व बोलतोय ते सध्या बाॅलीवूडची शिखरे यशस्वीपणे पादाक्रांत केल्यानंतर आता हाॅलीवूडची अव्वल तारका बनत असलेली अभिनेत्री प्रियंका चाेप्राबद्दल. अलीकडेच प्रियंकाचा मनाेरंजन जगतातातील अव्वल ५० महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आता प्रियंका स्वत: एक उद्याेजक म्हणून पुढे येत आहे. काही महिने अगाेदरच प्रियंकाने बम्बल अॅपमध्येदेखील गुंतवणूक केली आहे.  

 

 

बम्बल अॅप हा एक एडिटिंग अॅप असून प्रसिद्ध डेटिंग अॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिंडरच्या सहसंस्थापक विटनी वाेल्फ हर्ड यांनी टिंडरला रामराम केल्यानंतर २०१४ वर्षात हे अॅप बाजारात आणले. प्रियंका या अॅपची ब्रँड अॅम्बेसेडर हाेण्याबराेबरच त्यांच्या जाहिरातींवरदेखील लक्ष ठेवून आहे. सेरेना विल्यम्सनेही या अॅपमध्ये गुंतवणूक केली आहे. याअगाेदर प्रियंकाने हाॅबर्टन स्कूल ऑफ साॅफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्येही ८.२ दशलक्ष डाॅलरची गुंतवणूक केली हाेती. ती आता येथे विश्वस्त मंडळावर आहे. केवळ इतकेच नाही तर प्रियंका पर्पल पेबल पिक्चर्स या नावाने एक प्रॉडक्शन हाऊसदेखील चालवत आहे. २०१३ मध्ये सुरू झालेले हे प्रॉडक्शन हाऊस शाहरुख खान, सलमान खान, अक्षयकुमार, आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या तुलनेत खूप वेगळे आहे. हे हाऊस प्रादेशिक चित्रपटांवर जास्त भर देते. या वर्षी पर्पल पेबल पिक्चर्स ९ चित्रपट प्रदर्शित करणार आहे. हे हाऊस नेटफ्लिक्ससाठीही या वर्षात वेब सिरीज बनवणार आहे.  प्रियंकाची भलेही क्वांटिकाे या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून अमेरिकेत स्वत:ची ओळख निर्माण झाली असली तरी अमेरिकेत तिची सुरुवात अमेरिकन रेकाॅर्ड प्राेड्युसर जिमी आयाेवीन यांच्याबराेबर झाली हाेती. प्रियंकाच्या आधी यूएस सिंगल ‘इन माय सिटी’ ची जिमीने निर्मिती केली हाेती. त्यानंतर २०१३ या वर्षात तिची दुसरी सिंगल ‘ एग्झाॅटिक’ पिटबुलबराेबर आली. क्वांटिकाे मालिकेत काम मिळण्यापूर्वी ती एका गॅस कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर हाेती. आतापर्यंत तिने तीन हाॅलीवूड चित्रपटांत काम केले आहे. हाॅलीवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर २०१६ मध्ये प्रियंकाने एक मुुलाखत देताना सांगितले हाेते की, आतापर्यंत आपण ६ हाॅलीवूड चित्रपटांत काम करण्यासाठी नकार दिला अाहे. ती आपल्या चित्रपटांची निवड अतिशय सतर्कपणे करत आहे. चित्रपटांमध्ये काम करतानाच ती मेट गालासारख्या माेठ्या इव्हेंटचाही एक महत्त्वाचा भाग बनत आहे. अतिशय प्रसिद्ध समजल्या जाणाऱ्या ‘ द एलन शाे’मध्येदेखील तिने दाेन वेळा काम केले आहे. फाेर्ब्जच्या म्हणण्यानुसार प्रियंकाने १ जून २०१६ पासून ते १ जून २०१७ पर्यंत १ कोटी डाॅलरची कमाई केली हाेती.  

 

पुढे काय करणार?
प्रियंका आपल्या आगामी ‘ द स्काय इज पिंक’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाची दिग्दर्शक शाेनाली बाेस आहे. हा चित्रपट या वर्षाच्या ऑक्टाेबरमध्येे प्रदर्शित हाेणार आहे. काऊबाॅय निंजा वायकिंग्ज हा तिचा आगामी हाॅलीवूडचा चित्रपट. त्यात तिच्यासोबत ख्रिस पॅट आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...