आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Recently Celebrated Her Birthday, Her Birthday Cake Was Of 3,45,000 Rupees, Was Ready In 24 Hours

प्रियांका चोप्राने तिच्या बर्थ-डेला कापला होता 3.45 लाख रुपयांचा केक, 24 तासांत झाला होता तयार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राने 18 जुलैला आपला 37 वा वाढदिवस साजरा केला होता. तिचे बर्थ-डे सेलिब्रेशन मियामीमध्ये झाले होते. या सेलिब्रेशनमध्ये प्रियांकाने रेड शिमरी ड्रेससोबत सिंदूर लावून सर्वांचे लक्ष वेधले होते. पण आणखी एक गोष्ट होती ज्याची खूप चर्चा झाली होती, तो होता तिचा बर्थ-डे केक. या मल्टीलेयर्ड केकच्या डिटेल्स आता समोर आल्या आहेत आणि हा खूप महाग आहे असे सांगितले जात आहे.  

 

केकची किंमत होती 3.45 लाख रुपये... 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांका बर्थ-डेला जो केक कप्तान दिसली होती त्याची किंमत 5,000 USD म्हणजेच सुमारे 3,45,000 रुपये होती. हा केक मियामीच्याच एका बेकरीने डिज़ाइन केला होता. प्रियांकाचा पती निक जोनसने या केकची ऑर्डर दिली होती. त्यावर गोल्ड आणि रेड डिटेल्स यासाठी करून घेतल्या होत्या कारण प्रियांकाने रेड ड्रेस घातला होता आणि तिला गोल्डन रंगाच्या वस्तू खूप आवडतात. हा केक बनवण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागला होता.  

 

बेकरीने शेअर केला केकचा फोटो... 
डिवाइन डेलीकसी बेकरीने हा केक तयार केला होता, ज्यांनी इन्स्टाग्रामवर केकचा फोटोदेखील शेअर केला आहे. बेकरीने जेनिफर लोपेज आणि टॉम क्रूज यांच्यासारख्या इंटरनॅशनल सेलेब्ससाठीदेखील केक डिज़ाइन केले आहेत.   

बातम्या आणखी आहेत...