आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः प्रियांका चोप्रा येत्या 2 आणि 3 डिसेंबर रोजी अमेरिकन गायक निक जोनाससोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्नासाठी प्रियांकाचे मुंबईतील घरावर रोषणाई करण्यात आली आहे. तिच्या सजलेल्या घराचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मेंदी आणि संगीत सेरेमनी
लग्नापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी मेंदी आणि संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी निक बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करणार आहे. प्रियांकाच्या चित्रपटातील गाणे 'गल्ला गुडियां..', 'देसी गर्ल..' 'पिंगा..' या गाण्यावर निक थिरकणार असल्याचे समजते. याशिवाय निक त्याच्या भावी पत्नीसाठी हिंदी गाणी गाणार आहे. तो त्याच्या टीमसोबत 45 मिनिटांचे गाण्यांचे सादरीकरण करणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी निकयांकाने त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससाठी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले आहे.
दोन पद्धतीने होणार लग्न...
निकयांका दोन पद्धतीने लग्न थाटणार आहेत. 2 डिसेंबर रोजी हिंदू आणि 3 डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघे लग्न करणार आहेत.1 डिसेंबर रोजी निक आणि प्रियांका यांना हळद लागणार आहे. हिंदू पद्धतीने होणा-या लग्नात प्रियांका डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान करणार आहे. तर ख्रिश्चन पद्धतीने होणा-या लग्नात ती Ralph Lauren च्या आउटफिटमध्ये दिसेल.
लग्नानंतर होणार दोन रिसेप्शन...
एक रिसेप्शन दिल्ली त होणार आहे. हे ग्रॅण्ड रिसेप्शनल लग्नाच्या काही दिवसांनी आयोजित करण्यात येणार आहे. दुसरे रिसेप्शन मुंबईत बॉलिवूड फ्रेंड्ससाठी असेल. अद्याप दोन्ही रिसेप्शन पार्टीच्या तारखा समोर आलेल्या नाहीत.
चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा...
दीपवीरप्रमाणेच प्रियांका आणि निक यांच्या लग्नाचे फोटोज बघण्यासाठी चाहत्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. लग्नात कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने लोकांना फोटोज क्लिक करता येणार नाहीत. याशिवाय प्रियांका आणि निक त्यांच्या लग्नमंडपात अर्थातच उम्मेद भवनमध्ये हेलीकॉप्टरने पोहोचणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.