आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. प्रियांका चोप्रा म्हणते की, मला भारतात लग्न करायचे नव्हते. तिने 'Fallon Tonight' या हॉलिवूड टीव्ही शोमध्ये हा खुलासा केला. या शोमध्ये प्रियांका डिझाइनर टेरेसा हेल्बिगच्या प्लंगिंग व्हाइट सूटमध्ये खुप ग्लॅमरस दिसत होती. शोच्या होस्टने प्रियांकाला विचारले की, भारतात लग्न करायचे हे तु पहिल्यापासूनच ठरवले होते का. यावर प्रियांका म्हणाली, "नाही. मला एखाद्या प्रायव्हेट आयलँडवर लग्न करायचे होते, जिथे सर्व काही उपलब्ध असेल." प्रियांका सांगते की, तिने मालदीव आणि मॉरिशसारख्या आयलँडचा विचार केला होता. पण असे होऊ शकले नाही.
कुणाच्या इच्छेसाठी प्रियांकाने भारतात लग्न केले
- प्रियांकाने बोलताना सांगिगतेल की, "निक मुंबईत आला तेव्हा म्हणाला की, आपण भारतात लग्न का करु नये? मी माझ्या नवरीला तिच्या घरुन घेऊन जाईल."प्रियांकाचे बोलणे ऐकून होस्ट Wow! म्हणाला...
- 36 वर्षांच्या प्रियांकाने 10 वर्षे लहान अमेरिकी सिंगर निक जोनाससोबत 1 आणि 2 डिसेंबर रोजी जोधपुरच्या उमैद भवन पॅलेसमध्ये लग्न केले. त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पध्दतीने लग्न केले.
आपल्या व्हायरल फोटोवरही बोलली प्रियांका
- काही दिवसांपुर्वी प्रियांका निकचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये प्रियांका निकच्या मिठीत झोपलेली दिसत होती. तर निकच्या हातात बिअर होती.
- स्वतः प्रियांकाने हा बेडरुम फोटो शेअर केला होता. पण हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले. सोशल मीडिया यूजर्स तिला फोटो कुणी काढला असे बरेच काही प्रश्न विचार होते.
- 'Fallon Tonight' शोमध्ये प्रियांका म्हणाली की, हा फोटो 3 फेब्रुवारीला सुपर बाउल संडेला काढण्यात आला होता. तिने सांगितले की, ती ग्रुपमध्ये बसली होती, तेव्हाच तिला निकच्या मिठीत झोप लागली आणि कजिन दिव्या ज्योतीने गुपचूप हा फोटो कॅप्चर केला.
View this post on InstagramA post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on Feb 3, 2019 at 8:25pm PST
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.