Home | Gossip | priyanka chopra said at that time she never think she will marry nick Jonas

प्रियांकाला कधीच नव्हते वाटले की, ती 10 वर्षे लहान निक जोनससोबत लग्न करेल, अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा, हेदेखील सांगितले की,  कोणत्या नावाने मारते हाक 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 12:37 PM IST

सेक्शुअल हैरेसमेंटबद्दल बोलली प्रियांका - 'महिलांसाठी ती अट बनली होती...'

 • priyanka chopra said at that time she never think she will marry nick Jonas

  मुंबई : प्रियांका चोप्राने सांगितले की, तिला कधीच वाटले नव्हते ती 10 वर्षे लहान निक जोनससोबत लग्न करेल. 36 वर्षांची प्रियांका न्यूयॉर्कमध्ये 'वुमन इन द वर्ल्ड समिट' मध्ये आपल्या आणि निक जोनसच्या नात्याविषयी बोलत होती. पॅनल डिस्कशनदरम्यान प्रियांका म्हणाली की, अफेयरच्या सुरुवातीला निकने तिला खूप सरप्राइज केले होते. ती म्हणाली, "निकला मी दोन वर्षांपासून ओळखते. जे काही झाले, त्याबद्दल मला कधीही वाटले नव्हते की, हे असे होईल."

  प्रियांका निकला म्हणते ओल्ड मॅन जोनस...
  प्रियंकाने सांगितले की, ती निकला ओल्ड मॅन जोनस म्हणते. ती म्हणते की, तिच्यासाठी निकचे नाव OMJ आहे. अभिनेत्रीने सांगितल्यानुसार, निक खूपच स्मार्ट, मॅच्युअर व्यक्ती आहे आणि तिच्यासाठी खूप चांगला आहे. प्रियांका म्हणाली, "मी बिनधास्त मुलगी आहे. मला जे चांगले वाटते मी तेच करते. यात मला निकचा बरोबरीचा सपोर्ट मिळतो."

  प्रियांका म्हणाली, 'जे निकने माझ्यासाठी केले ते कुणीच माझ्यासाठी केले नव्हते...'
  प्रियंकाने निकच्या आणि तिच्या रिलेशनशिपविषयी संतना एका घटनेची आठवण सांगितली. तिने सांगितले की, एकदा निक आणि त्याच्या मित्रांनी नाइट आउटचा प्लान बनवला. पण प्रियंकाला एका महत्वाच्या कामासाठी सकाळी जायचे होते. तेव्हा निक तिला म्हणाला की, तो त्या लोकांपैकी नाही की, तिचे इतके महत्वाचे काम कंसाला करायला लावेल. प्रियांका म्हणाली, "निक म्हणाला तू आज जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी तू खूप मेहनत केली आहे. त्यामुळे जर तुला एखादे महत्वाचे काम असेल तर ते तुलाच करावे लागेल. मी मित्रांसोबत बाहेर जातोय. तुझे महत्वाचे काम पूर्ण झाले कि तू तिकडे ये." प्रियंकाने पुढे सांगितले, "मी जे काही मिळवले आहे, त्यासाठी निकने मला क्रेडिट दिले. यापूर्वी माझ्यासाठी हे कुणीही केले नव्हते."

  सेक्शुअल हैरेसमेंट महिलांसाठी अट बनली होती...
  प्रियंकाने यादरम्यान #MeToo कॅम्पेनबद्दल बोलताना म्हणाली, "सेक्शुअल हैरेसमेंट महिलांसाठी अट बनले होते. पण आता जेव्हा आम्ही एकमेकांना सपोर्ट करत आहोत. तेव्हा लोकांकडे आमचा आवाज दाबण्याची टाकत नाहीये." मागच्यावर्षी बॉलिवूडमध्ये #MeToo कॅम्पेनचे वारे वाहत होते आणि साजिद खान, विकास बहल, राजकुमार हिरानी, अनु मलिक, आलोक नाथ आणि नाना पाटेकर यांच्यसह अनेक जणांवर सेक्शुअल हैरेसमेंटचे आरोप केले गेले होते.

Trending