आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राच्या ड्रेसवर फिदा होऊन निक जोनसने पत्नीला दिले एक सुंदर गिफ्ट, पण बदल्यात पत्नीकडून मिळाले असे उत्तर की, तुटू शकते निकचे हृदय 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने होळीला तिला एक सुंदर गिफ्ट दिले. निकने प्रियांकाच्या नव्या ड्रेस वाल्या फोटोवर तीन हार्ट बनवून तिचे मन जिंकले आहे. प्रियांकाच्या या ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमधला फोटो सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे. मात्र एकीकडे जिथे निक जोनसने प्रियंकाला इतके सुंदर गिफ्ट दिले, तेव्ह दुसरीकडे प्रियांकाने मात्र निकला हैराण करणारे उत्तर दिले. प्रियांका चोप्रा म्हणाली की, ती एक चांगली पत्नी नाही. 

एबीसीच्या चॅट शो 'द व्यू' मध्ये प्रियांकाने तिच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यादरम्यान प्रियांका म्हणाली, ''मला स्वयंपाक करता येत नाही. ज्यावेळी निकने मला प्रपोज केले होते, मी तेव्हाच त्याला सांगितले होते की, मला स्वयंपाक करता येत नाही. मी निकला म्हणाले होते, तुझी आई खूप छान स्वयंपाक करते पण लक्षात ठेव तू तशा मुलीसोबत लग्न करत नाहीयेस. मी स्वयंपाक करू शकत नाही.''

स्वयंपाकात केवळ अंडे बनवता येतात प्रियांकाला...
36 वर्षांच्या प्रियंकाने सांगितले की, तिला फक्त अंडे बनावट येतात. प्रियांका म्हणाली, 'स्वयंपाकाच्या बाबतीत मी खूपच खराब पत्नी आहे. पण यामध्येही मजेशीर गोष्ट ही आहे की, जेव्हा मी त्याला म्हणते बेब मी स्वयंपाक करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो की, ठीक आहे बेब मलादेखील बनवता येत नाही.''