आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Said, 'I Would Prefer To Join The Race For Becoming Prime Minister Of India ...'

प्रियांका चोप्रा म्हणाली - 'मी भारताची पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सामील होणे पसंत करेन...' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राचे म्हणणे आहे की, भारताची पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत ती सामील होऊ इच्छिते. झाले असे की, एका इंटरव्यूमध्ये तिला राजकारणात एंट्री घेण्याबद्दल प्रश्न विचारला गेला. उत्तरात प्रियांका म्हणाली, "मी भारताची पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सामील होणे पसंत करेन आणि माझी इच्छा आहे की, निकने यूएसच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी." प्रियांका पुढे म्हणाली, "मला राजकारणाशी निगडित कोणत्याच गोष्टी आवडत नाही. पण माहिती आहे की, आम्हाला दोघानांही बदल हवा आहे आणि कधीही नाही म्हणत नाही."

 

रोमियो जुलिएटच्या री-क्रिएशनबाबद चर्चेत होते कपल... 
रविवारी प्रियांका चोप्रा कॅलिफोर्नियाच्या डिग्निटी हेल्थ स्पोर्ट पार्कमध्ये झालेल्या वैंगो-टैंगो कॉन्सर्टमध्ये जोनास ब्रदर्सला सपोर्ट करण्यासाठी पोहोचली होती. याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यातील एकामध्ये तिने निकसोबत रोमियो-जूलिएटची स्टोरी री-क्रिएट केली होती. फोटोजिथे निक पेपर कप हातात घेऊन बाल्कनीत उभा होता तर खाली प्रियांका त्याला पाहताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "रोमियो ओह रोमियो...अँड अवा ड्रियू...#नाइटआउट."

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Romeo oh Romeo.. 😍❤️💋 and Ava drew #nightout

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

'द स्काय इस पिंक' मध्ये काम करत आहे प्रियांका चोप्रा... 
मेमध्ये पती निक जोनाससोबत 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर डेब्यू केलेली प्रियांका चोप्रा डायरेक्टर सोनाली बोसच्या बॉलिवूड चित्रपट 'द स्काय इस पिंक' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर आणि जरीना वहाब यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपट याचवर्षी 11 ऑक्टोबरला रिलीज होईल. याव्यतिरिक्त ती प्रोड्यूसर माइंडी कलिंगसोबत एका हॉलिवूड प्रोजेक्टवरदेखील काम करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...