आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा रंगला प्रियांका-निकचा संगीत सोहळा, आईसोबत पीसीने धरला ताल, अंबानी कुटुंबीयांची होती उपस्थिती : PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला आहे. जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये थाटामाटात झालेल्या या लग्नातील संगीतसोहळ्याचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सोहळ्यात प्रियांकाने सिल्व्हर अॅम्ब्रायडेड साडी नेसली होती. तर निकने ब्लू कुर्ता परिधान केला होता. विदेशी पाहुण्यांनीही बॉलिवूडमधील काही गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. प्रियांका निकच्या आनंदात सहभागी होण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि निता अंबानीदेखील उपस्थित होते. यावेळी प्रियांका चोप्रा आपल्या आईसोबत मधू चोप्रा यांच्यासोबत थिरकली. यावेळी निकचे मित्रदेखील त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आले होते.  


पाहुयात, या संगीत सोहळ्याची खास झलक छायाचित्रे... 

 

बातम्या आणखी आहेत...