आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाचा अमेरिकन नवरदेव निकने हिंदी गाण्यांवर केला डान्स, 45 मिनिटे केले परफॉर्म, आपल्या प्रसिध्द गाण्यावर थिरकली प्रियांका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. 30 नोव्हेंबरला प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची संगीत सेरेमनी आणि कॉकटेल पार्टी ठेवण्यात आली होती. रात्री 8 वाजतापासून सुरु झालेली संगीत सेरेमनीचे डेकोरेशन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधून हा सोहळा किती शाही होता हे दिसतेय. ब्लॅक-गोल्डन अँड सिक्वर थीमवर ही सेरेमनी झाली. प्रियांकाने आई मधु चोप्रासोबत धमाकेदार डान्स परफॉर्मेन्स दिला. तर निकने गल्ला गुडियावर प्रियांकासोबत डान्स करुन सर्वांना सरप्राइज केले. हे गाणे प्रियांकाच्या 'दिल धडकने दो' मधील ही हिट गाणे आहे. 

 

प्रियांकानेही केला डान्स 
देसी गर्ल प्रियांकानेही दोस्ताना चित्रपटातील देसी गर्लवर डान्स केला. यावेळी क्वांटिकीची को-स्टार आणि मैत्रिण यासमीन अल मसरीसोबत तिने परफॉर्मेन्स दिला. यावेळी निकने हिंदी गाणे गात आपल्या ट्रूपसोबत जवळपास 45 मिनिट परफॉर्मेन्स दिला. यासोबतच संगीत सेरेमनीमध्ये सनम बँड आणि बॉलिवूड सिंगर मानसी स्कॉटनेही परफॉर्मेन्स दिला. तर प्रियांची बहीण परिणितीने बहिणीसाठी डान्स केला. सेरेमनीमध्ये सर्व डान्स परफॉर्मेन्स कोरियोग्राफर गणेश हेगडने कोरियोग्राफ केले होते. या लग्नात रणबीर कपूर आणि आलिया भट पोहोचू शकतात अशा चर्चा आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...