• Home
  • Gossip
  • Priyanka Chopra seen while relaxing in pool in Italy, few days ago nick shared a romantic dance video

Bollywood / इटली मध्ये निकसोबत रोमँटिक डान्स आणि आता पूलमध्ये रिलॅक्स करतांना दिसली प्रियांका चोप्रा, व्हायरल होत आहेत फोटो

निकने शेअर केला होता रोमँटिक डान्स व्हिडीओ... 

​​​​​​​

दिव्य मराठी वेब

Jul 10,2019 11:43:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा मागच्या काही दिवसांपासून आपल्या दीर आणि जावेच्या लग्नामुळे चर्चेत आहे. लग्नात प्रियंका वेस्टर्नपासून ते इंडियन कपड्यांमध्ये दिसली. विशेष म्हणजे प्रियांकाने सोफी आणि जो यांच्या लग्नात साडी परिधान केली होती. प्रियांकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला. लग्नाच्या काही दिवसांनंतर प्रियंकाने सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत आणि ते खूप व्हायरलही होत आहेत.

हे फोटोज प्रियांकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांका पूलमध्ये आराम करताना दिसत आहे. हे फोटोज निक जोनसने काढले आहेत. याचा खुलासा प्रियांकाच्या पोस्टमध्ये असलेल्या कॅप्शनने झाला आहे. प्रियंकाने फोटो शेअर करून लिहिले, 'सुट्ट्यांचा योग्य वापर. पतीने फोटो काढले आहेत.' काही फोटोजमध्ये प्रियांका हातात ग्लास घेऊन दिसते आहे. या फोटोजमध्ये पुलचे बॅकग्राउंड खूपच छान दिसते आहे.

निकने शेअर केला होता रोमँटिक डान्स व्हिडीओ...
काही दिवसांपूर्वी त्यांचा एक रोमँटिक व्हिडीओ वायरल झाला होता. हा व्हिडिओ प्रियांकाचा पती निक जोनासनेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे आणि हा खूप वेगाने व्हायरल होत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसव्हिडिओमध्ये खूपच रोमँटिक दिसत आहेत आणि हा व्हिडीओ इटलीचा आहे. इटलीच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात दोघे डान्स करताना आणि एन्जॉय करताना दिसत आहेत. निक आणि प्रियांका या व्हिडिओमध्ये खूपच रोमँटिक आणि क्युट दिसत आहेत.

🇮🇹 + ❤️

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

X
COMMENT