आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका चोप्राने केले 10 वर्षांनी लहान असलेल्या पतीला Kiss, व्हायरल झालेल्या फोटोमुळे सोशल मीडिया यूजर्स उडवत आहेत खिल्ली, एकाने लिहिले, \'हे सर्व बंद खोलीतच चांगले वाटते\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्राने इंस्टाग्रामवर एक फोटो शेयर केला आहे, ज्यामध्ये ती पती निक जोनासला Kiss करताना दिसत आहे. प्रियांकाने फोटोसोबत लिहिले आहे, , "पृथ्वीतलावरच्या सर्वात स्टाइलिस्ट माणसाला Kiss करून मला गर्व वाटतो आहे." हा फोटो प्रियांकाने लंडनहुन शेयर केला आहे आणि 21 तासाच्या आत 30 लाख लोकांनी हा फोटो पहिला आहे. मात्र यामुळे त्याना खूप ट्रोलही केले जात आहे. सोशल मीडिया यूजर्सने लिहिले, "तैमूरला Kiss केल्यानंतरही असेच वाटेल.."

 
सोशल मीडिया यूजर्सकडून प्रियांका आणि निकच्या या फोटोची खूप खिल्ली उडवली जात आहे. एका यूजरने लिहिले, "तैमूरला Kiss केल्यानंतरही असेच वाटेल.." दुसऱ्या एका यूजरने लिहिले, "स्टाइलिश ठीक आहे, पण भूतलावरचा सगळ्यात स्टायलिश माणूस...हे जरा जास्त झाले" एका युजरने लिहिले, "तुला निकची गरज केवळ मुलांसाठी आहे." एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, "हे सगळं रुममध्येच चांगले वाटते" एका यूजरची कमेंट आहे, "आई मुलामध्ये किती प्रेम आहे" तर दुसरीकडे एका यूजरने लिहिले, "बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा" एका यूजरने प्रियंकाला विचारले, "काकू तुम्ही लहान मुलासोबत लग्न का केले, कुणी काका मिळाले नाही का?"

याच महिन्यात प्रियंकाने निकसोबत लग्न केले होते.. 
36 वर्षांच्या प्रियांका चोप्राने 1 आणि 2 डिसेंबरला जोधपुरच्या उमैद भवन पैलेसमध्ये 10 वर्ष लहान निक जोनाससोबत लग्न केले. हे लग्न आधी ख्रिश्चन आणि मग हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले. यानंतर 4 डिसेंबरला प्रियांका-निकने नवी दिल्लीमध्ये रिसेप्शन दिले, ज्यामध्ये पीएम मोदी खास पाहुणे होते. 20 डिसेंबरला मुंबईत बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी प्रियांका-निकने रिसेप्शन दिले. आता कपल लंडनमध्ये फिरत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...