प्रियांका चोप्राची 23 वर्षांच्या जावेने केला तिच्या आजाराबद्दल खुलासा, म्हणाली - मनात अनेकदा यायचा आत्महत्या करण्याचा विचार 

5-6 वर्षे आजाराशी झुंझत होती सोफी, बिछान्यातून उठणे, बाहेर जाणे होते सर्वात मोठे चॅलेंज...

दिव्य मराठी

Apr 23,2019 01:20:00 PM IST

मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री आणि प्रियांका चोप्राची जाऊ सोफी टर्नर बराच काळ डिप्रेशनचा सामना करत होती. तिचे म्हणणे असेही आहे की, त्यामुळे अनेकदा तिच्या मनात सुसाइड करण्याचेही विचार यायचे. झाले असे की, 23 वर्षांची सोफी अमेरिकन चॅट शो 'Dr. Phil's Phil in the Blanks' मध्ये आपल्या हेल्थ इश्यूबद्दल सांगत होती. ती म्हणाली, "प्यूबर्टीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर डिप्रेशन खूप वाढले होते आणि 17 व्य वर्षी तर सिचुएशन खूप गंभीर झाली होती."

सोफी म्हणाली - बेडवरुन उठणे आणि बाहेर जाणे सर्वात मोठे चॅलेंज होते...
- सोफीने चॅट शोमध्ये सांगितले, "माझ्याकडे काहीही करण्याचे किंवा बाहेर जाण्यासाठी काही मोटिवेशन नव्हते. एवढेच नाही तर आपल्या बेस्ट फ्रेंड्सलाही मी पाहू इच्छित नव्हते. त्यांच्यासोबत कुठेच जायची किंवा काही खायची इच्छा नव्हती. मी केवळ रडत असायचे. कपडे बदलायचे आणि पुन्हा ते ठेऊन द्यायचे, हा विचार करून की, हे माझ्याकडून होणार नाही. मी बाहेर जाऊ शकत नाही. माझ्याकडे हे सर्व करण्याचे काही कारण नव्हते."
- सोफीनुसार, तिने 5-6 वर्षे डिप्रेशनचा सामना केला. ती म्हणते, "मी 5-6 वर्षे डिप्रेशनने ग्रस्त होते. सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासाठी बेडवरुन उठणे आणि बाहेर जाणे होते. स्वतःवर प्रेम करायला शिकणे सर्वात मोठे आव्हान असते."

लहानपणापासूनच येत होते आत्महत्या करण्याचे विचार...
सोफी पुढे म्हणते, "हे थोडे विचित्र आहे. मी लहानपणी जास्त डिप्रेस्ड नव्हते, पण माझ्या मनात सुसाइड करण्याचे विचार सतत यायचे. मला माहित नाही की, असे का व्हायचे. पण असू शकते हे माझे एक विचित्र अट्रॅक्शन असेल. मी याबद्दल खूप विचार करायचे. मला नाही वाटत की, थोडाही वेळ गेला असेल की, जेव्हा मी याबद्दल विचार केला नसेल."

आता सोफीची तब्येत ठणठणीत आहे...
सोफीने सांगितले कि आता ती मेडिटेशनवे आहे आणि स्वतःवर प्रेम करू लागली आहे. ती आता थेरपी आणि ट्रीटमेंटचा आधार घेत आहे आणि आता तिची तब्येत बारी होत आहे. 'गेम ऑफ़ थ्रोंस' यांसारख्या सीरियल्सची अभिनेत्री सोफी लवकरच प्रियांकाचा दीर जो जोनाससोबत लग्न करणार आहे. जोनासने अशातच एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, त्याचे लग्न फ्रांसमध्ये होईल.

X