आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता फरहान अख्तरच्या मुलाची 'आई' होणार आहे प्रियांका चोप्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: प्रियांका चोप्रा सध्या सलमान खानचा 'भारत' चित्रपट सोडल्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून सलमान खान आणि प्रियांकामधील वादाच्या बातम्या येत आहेत. याच काळात आता प्रियांकाने आगामी चित्रपट 'स्काय इज पिंक'ची शूटिंग सुरु केली आहे. चित्रपटात प्रियांका चोप्रा पहिल्यांदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये ती फरहान अख्तरच्या मुलीच्या आईची भूमिका साकारणार आहे. फरहानच्या मुलीची भूमिका 'दंगल' फेम जायरा वसीम साकारणार आहे. 


सोडला सलमान खानचा 'भारत' 
प्रियांकाने शेवटच्या घडीला सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट सोडला. यामुळे ती चर्चेत आली. 'भारत'चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने शुक्रवारी 27 जुलैला एक ट्वीट करुन प्रियांकाने चित्रपट सोडल्याचे कन्फर्म केले होते. प्रियांका आणि निक जोनासचे लग्नाचे कारण यावेळी देण्यात आले होते.

 

आयशा चौधरीवर आधारित आहे 'स्काई ईज पिंक'
प्रियांकाचा पुढचा चित्रपट मोटिव्हेशनल स्पीकर आयशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. आयशाला वयाच्या 13 व्या वर्षी पल्मोनरी फायब्रोसिस नावाचा आजार झाला होता. याच आजारामुळे वयाच्या अवघ्या 18 वर्षी 24 जानेवारी, 2015 ला तिचा मृत्यू झाला. आयशाच्या मृत्यूच्या एक दिवस आधीच तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. 


प्रियांकाचा हॉलिवूड चित्रपट झाला पोस्टपोन
काही दिवसांपुर्वी प्रियांकाने 'काउबॉय निंजा वाइकिंग' हा हॉलिवूड चित्रपट साइन केला होता. यामध्ये तिच्यासोबत अॅक्टर क्रिस प्रॅट काम करणार होता. परंतू फिल्ममेकर्सने सध्या रिलीज कॅलेंडरवरुन चित्रपटाचे नाव काढून टाकले आहे. आता चित्रपट तयार होण्यास आणि रिलीज होण्यास दिर्घकाळ लागणार आहे. पहिले हा चित्रपट 28 जून, 2019 ला रिलीज होणार होता. 

बातम्या आणखी आहेत...