आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या मुलीच्या एंगेज्मेंट सेरेमनीनंतर भाऊ आणि आईसोबत वेळ घालवतेय प्रियांका, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा इटलीतील लेक कोमो येथे 21 सप्टेंबर रोजी साखरपुडा झाला. या सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अभिनेत्री प्रियांका चोप्राही या सेरेमनीत पोहोचली होती. यावेळी प्रियांका एकटी नव्हे तर तिची आई मधु चोप्रा आणि धाकटा भाऊ सिद्धार्थसोबत हजर होती. सेरेमनी संपल्यानंतर प्रियांका तिच्या आई आणि भावासोबत वेळ घालवताना दिसली. यावेळी प्रियांका ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने यलो आणि रेड कलरचा फ्लोरल प्रिंटची डिझाइन असलेला डिझायनर वन पीस परिधान केला होता. तिच्या हातात मॅचिंग पर्सही होती. प्रियांकाने इटलीतील लेक कोमो येथील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  


सोबत दिसला नाही निक जोनास..
- ईशा अंबानीच्या साखरपुड्याच्या पहिल्या दिवशी प्रियांका तिचा भावी पती निक जोनाससोबत दिसली होती.

 

- एंगेज्मेंट पार्टीत निक प्रियांकोसबत होता. पण जेव्हा प्रियांका तिच्या आई आणि भावासोबत निवांत वेळ घालवत होती, त्यावेळी निक गैरहजर होता.

 

- प्रियांकाच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, ती सध्या 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर मेन लीडमध्ये आहे. 

बातम्या आणखी आहेत...