आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Spotted Along With Fiance Nick Jonas At Isha Ambani Engagement In Lake Como

मुकेश अंबानींच्या मुलीच्या साखरपुड्याला भावी पतीसोबत पोहोचली प्रियांका चोप्रा, जान्हवी कपूर-अनिल कपूरही पोहोचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इटलीः प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीचा शुक्रवारी बिझनेसमन आनंद पीरामलसोबत साखरपुडा झाला. इटलीत झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा भावी पती निक जोनाससोबत पोहोचली होती. यावेळी प्रियांका पीच कलरच्या सिल्व्हर एम्ब्रायडरी असलेल्या साडीत दिसली. तर निक जोनास ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट झाला. त्यांच्यासोबत फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राही यावेळी उपस्थित होते. याचवर्षी जून महिन्यात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत साखरपुडा झाला होता, त्यावेळी झालेल्या पार्टीतही प्रियांका निकसोबत सहभागी झाली होती. पण त्यावेळी निक आणि प्रियांकाचा साखरपुडा झाला नव्हता. 18 ऑगस्ट रोजी मुंबईत 36 वर्षीय प्रियांकाने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेल्या अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत साखरपुडा केला होता. दोघांचे यावर्षी लग्न होण्याची शक्यता आहे. 


अनिल कपूर आणि जान्हवीसह पोहोचले अनेक सेलेब्स...  
- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्याव्यतिरिक्त अनिल कपूर, मनीष मल्होत्रा आणि जान्हवी कपूरही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले आहेत. याशिवाय सोनम कपूर, प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा आणि भाऊ सिद्धार्थ, जान्हवीची बहीण खुशी कपूर हे सेलिब्रिटीही येथे पोहोचले आहेत. मनीष मल्होत्रा त्यांची मैत्रीण नताशा आर आदर पूनावालासोबत प्रायव्हेट जेटने लेक कोमो येथे पोहोचले होते. मनीषने सोशल मीडियावर प्रियांका आणि निकसोबतचा एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, "द फैबुलस अँड चार्मिंग कपल."

 

तीन दिवस चालणार मुकेश अंबानीच्या मुलीच्या साखरपुड्याचे सेलिब्रेशन 
- ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांच्या साखरपुड्याचे सेलिब्रेशन इटलीतील लेक कोमो येथे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 21 सप्टेंबर रोजी साखरपुडा झाला. 22 सप्टेंबर रोजी अंबानी कुटुंबीयांनी पाहुण्यांसाठी खास इटॅलियन फूडची व्यवस्था केली आहे. यासोबतच रात्री डिनर आणि डान्स पार्टी होणार आहे. 23 सप्टेंबर रोजी सेलिब्रिटी गेस्टसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पार्टी दुओमो दि कोमो आणि टीस्ट्रो सोशिएल कोमो (Duomo di Como & Teatro Sociale Como) मध्ये होणार आहे. 

 

कोण आहे आनंद पीरामल

- आनंद पीरामल यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनियामधून इकोनॉमिक्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. शिवाय हॉवर्ड बिजनेस स्कूलमधून त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्स केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पीरामल ई स्वास्थ आणि पीरामल रिअॅलिटी हे दोन स्टार्टअप सुरु केले आहेत. याशिवाय ते पीरामल ग्रुपचे एग्झिक्यूटिव डायरेक्टर आहेत. इतकेच नाही तर आनंद ‘इंडियन मर्चंट चेंबर’च्या युथ विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्ष राहिले आहेत. ईशाविषयी सांगायचे म्हणजे ती रिलायन्स  Jioची जबाबदारी सांभाळत आहे. ती रिलायन्सच्या टेलीकॉम आणि रिटेल कंपन्यांची डायरेक्टर आहे. तिने तिचा भाऊ आकाश अंबानीसोबत मिळून 2014 मध्ये Jioची 4जी सर्विस लाँच केली होती. याशिवाय ईशाने ajio नावाने एक ऑनलाइन फॅशन रिटेलर ब्रॅण्डही सुरु केला आहे. तिने येल युनिव्हर्सिटीतून सायकॉलॉजी आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये  ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...