आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढा महागडा ड्रेस घालून न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरतांना दिसली प्रियांका चोप्रा, तरीही फॅन्सला आवडला नाही लुक, एक म्हणाला, 'किती वाईट आहे' तर दुसरा म्हणाला, 'उगीच पैसे वाया घालवले' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा आपले स्टाइल आणि लुकसाठी खूप प्रसिद्ध आहे. पार्टीजपासून ते इव्हेंट्स आणि फंक्शनमध्ये प्रत्येकवेळी प्रियांकाचा स्टनिंग लुक पाहायला मिळतो. पुन्हा एकदा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरतानाचा पीसीचा गॉर्जियस लुक पाहायला मिळाला. तिने जो ड्रेस परिधान केला होता त्याची किंमत जवळपास 4 लाख रुपये आहे. मात्र, सोशल मीडिया यूजर्सला तिची स्टाइल अजिबात आवडली नाही. यूजर्स तिच्या या अटायरला अत्यंत वाईट म्हणत आहेत. एकाने कमेंट केले, 'पीसीने विनाकारण इतके पैसे वाया घालवले'  

काहीसा असा होता देसी गर्लचा लुक...
न्यूयॉर्कमध्ये फिरत असतांना प्रियांकाने लाइट ब्राउन कलरचे टॉप आणि ट्राउजर घातले होते. यामध्ये टॉपची किंमत 59 हजार रुपये आणि ट्राउजरची किंमत सुमारे 1 लाख 6 हजार रुपये एवढी आहे. ड्रेसवर पीसीने स्काय ब्लू कलरचा कोट घातला होता, ज्याची किंमत सुमारे 2 लाख 47 हजार रुपये आहे. पाहायला गेले तर प्रियांकाच्या संपूर्ण ड्रेसची किंमत जवळपास 4 लाख रुपये एवढी आहे. इतका महागडा ड्रेस घालूनही तिने खूप स्वस्तातले बूट त्यावर घातले होते. पीसीने यलो कलरचे पायथन प्रिंटचे बूट घातले होते त्याची किंमत 6200 रुपये आहे. तसे पहिले तर 4 लाख रुपयांच्या ड्रेसपुढे 6200 रुपयांचे बूट खूपच स्वस्त आहेत. 

वर्कफ्रंट... 

प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच फिल्म 'द स्काय इज पिंक' ने बॉलिवूडमध्ये परतणार आहे. या फिल्ममध्ये ती फरहान अख्तरसोबत स्क्रीन शेयर करणार आहे. सोनाली बोसच्या डायरेक्शनमध्ये बनणारी ही फिल्म याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...