आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकीकडे घटस्फोटाची अफवा पसरली असताना दुसरीकडे मात्र पतीसोबत मियामीच्या रस्त्यांवर फिरताना दिसली प्रियांका चोप्रा, घातला होता खूप शॉर्ट आणि ट्रान्सपरंट ड्रेस, हातात होता ज्युसचा ग्लास : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पसरत आहेत. यूएसच्या OK मॅगझिनने आपल्या सूत्रांद्वारे माहिती दिली आहे की, निक आणि प्रियांका यांच्यामध्ये सध्या वाद होत आहेत आणि ते वेगळे होण्याचा विचार करत आहेत. याच अफवेदरम्यान प्रियांका पती निकसोबत मियामीच्या रस्त्यांवर फिरतांना दिसली. यावेळी तिने खूप ट्रान्सपरंट आणि शॉर्ट ड्रेस घातला होता. झाले असे की, तिने ऑफ व्हाइट कलरची  बिकिनी आणि त्यावर नेटचा शॉर्ट कुर्ता घातला होता. प्रियांकाच्या हातात ज्युसचा ग्लासदेखील होता. पती-पत्नी दोघांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

घटस्फोटाच्या बातमीवर नाही आली कोणतीही प्रतिक्रिया... 
मॅगझिनच्या रिपोर्ट्सनुसार, दोघांनी लग्न करण्याची फार घाई केली आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळच दिला नाही. याच कारणामुळे त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत. मॅगझिनच्या सूत्रांनी हेदेखील सांगितले आहे की, निकला वाटायचे प्रियांका कूल आणि समजदार मुलगी आहे. पण लग्नानंतर त्याला असे जाणवले की, त्याच्या पत्नीचा स्वभाव कंट्रोलिंग आहे. प्रियांका-निकच्या घटस्फोटाच्या अफवेवर या कपलची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 

- मात्र, प्रियांकाच्या काही जवळच्या व्यक्तींनी सांगितल्यानुसार, या रिपोर्टमधील बातमीमध्ये काहीही सत्यता नाही. ते दोघे एकमेकांसोबत खूप खुश आहेत आणि यावेळी मियामीमध्ये सासरच्यांसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.

दीराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये सामील झाली पीसी... 
प्रियांकाचा दीर फ्रैंकलिन जोनस ग्रॅज्युएट झाला आहे. अशातच त्याची ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली. या सेरेमनीमध्ये सासू सासऱ्यां सोबत प्रियांकादेखील सामील झाली होती. याप्रसंगी प्रियांका इतकी खुश होती की, तिने सासऱ्यांनाच आलिंगन दिले. तिने इंस्टाग्रामवर फॅमिली फोटोदेखील शेयर केला आहे. फोटो शेयर करून तिने कॅप्शन लिहिले, 'The man of the hour!! @franklinjonas we r so proud of u.. “Graduate” ! Can’t wait to witness what else u will accomplish in your life. To bigger and greater heights! Love u❤️'.  फ्रैंकलिनने ब्लॅकबर्ड अकादमीमधून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. 

- निक या सेरेमनीमध्ये सामील होऊ शकला नाही पण त्याने धाकट्या भावासाठी एक पोस्ट शेयर केली. त्याने लिहिले, 'So proud of my little brother @franklinjonas for graduating today! Really wish I could have been there with you... so glad some of the fam was there to celebrate with you. Love you dude!.'

पुढील स्लाइड्सवर पहा प्रियांका-निकचे काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...