आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्रा सध्या सासरच्या मंडळींसोबत मियामीमध्ये हॉलिडे एन्जॉय करता हे. याचदरम्यान ती सिंगर आणि म्यूझिशियन स्टीव अओकीच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली होती. तिच्यासोबत पती निक जोनस, जेठ-जाऊ जो जोनस - सोफी टर्नर आणि दीर हे सर्वदेखील होते. पार्टीमध्ये प्रियांका खूप मस्तीच्या मूडमध्ये दिसली आणि तिने खूप धिंगाणा केला. एवढेच नाही प्रियांकाने पतीसोबत मिळून फॅन्सवर खुप केकदेखील फेकले. स्टीव अओकी यासाठी प्रसिद्ध आहे की, त्याच्या कॉन्सर्टमध्ये ऑडियंसवर केक फेकले जातात. त्या दोघांचे काही फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रियांकाला पाहून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. एक म्हणाला, 'जेव्हापासून प्रियांका हॉलिवूडमध्ये गेली आहे ती ओव्हर अॅक्टिंगची दुकान बनली आहे.' दुसऱ्या एकाने कमेंट केले, 'कुणाकडे खायला काहीही न्हाई आणि ही केक फेकत आहे'. एका यूजरने लिहिले, 'उगीच केक वाया घालवला, गरिबांनाच वाटला असता.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.