आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची मनधरणी करण्यासाठी प्रियांकाने लढवली शक्कल, स्वतः केले असे ट्वीट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: सध्या प्रियांका चोप्रा बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ती गेल्या 2 वर्षांपासून हॉलिवूडमध्ये काम करतेय. यासोबतच ती बॉयफ्रेंड निक जोनाससोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. प्रियांका सध्या  ‘दी स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात परतली आहे. यापुर्वी प्रियांका 'भारत' या सलमान खान स्टारर चित्रपटात काम करणार होती. परंतू तिने अचानक या चित्रपटाला नकार कळवला. यामुळे सलमान तिच्यावर नाराज झाल्याचे वृत्त होते. आता सलमानची नाराजी दूर करण्यासाठी प्रियांका प्रयत्न करताना दिसतेय. 

 

हे कारण देत दिला होता चित्रपटास नकार 
- प्रियांका चोप्राने निक जोनसासोबत लग्न करण्यासाठी वेळ हवा आहे असे कारण देत सलमानचा 'भारत' हा चित्रपट नाकारला होता. परंतू याचा खुलासा प्रियांकाने केलेला नाही. या वागण्यामुळे सलमान थोडा दुखावलेला दिसला. यानंतर तिने आता सलमानची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसतेय. 
- प्रियांकाच्या अशा वागण्यावर सलमान काही दिवसांपुर्वीच बोलला होता. तो म्हणाला होता की, प्रियांका माझ्यासोबत नाही तर एखाद्या हॉलिवूड चित्रपटाच्या हिरोसोबत काम करेल. तिने हॉलिवूड चित्रपटासाठी भारत हा चित्रपट सोडला. यावरुन प्रियांकाला सलमानच्या नाराजीचा अंदाज आला असेल. यामुळे तिने त्याची मनधरणी करणे सुरु केले आहे. 

 

अशा प्रकारे करतेय मनधरणी
सलमान त्याचा मेहुणआ आयुष  शर्माला ‘लवरात्री’ या चित्रपटामधून लॉन्च करतोय. हेच निमित्त साधत प्रियांकाने या चित्रपटाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मित्रा आयुष चित्रपटसृष्टीमध्ये तुझं स्वागत आहे. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिला आणि मला विश्वास आहे तू नक्कीच एक चांगला अभिनेता होशील', असा मेसेज प्रियांकाने दिला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...