• Home
  • Gossip
  • Priyanka chopra was seen doing a dance in Paris with husband Nick Jonas, kisses each other

Bollywood / पती निक जोनाससोबत पॅरिसमध्ये डान्स करताना दिसली प्रियांका, एकमेकांना किसदेखील केले 

दीराच्या दुसऱ्या लग्नासाठी पोहोचली पॅरिसला 

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 10:26:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्राचा दीर जो जोनस आपली गर्लफ्रेंड सोफी टर्नरसोबत परत लग्न करणार आहे. यावेळी हे लग्न पॅरिसमध्ये होणार आहे. लग्नासाठी प्रियांका चोप्रा, निक जोनससह संपूर्ण कुटुंब पॅरिसला पोहोंचले आहे. प्रियांका आणि निकचे पॅरिसमधील एकही फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघे रोमांटिक पोजदेखील देत आहेत. या फोटोमध्ये हे स्टार कपल बोटमध्ये बसलेले दिसत आहेत.

निकनेदेखील एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांनीही गॉगल लावलेला आहे. तर निक सिगारेट पिताना दिसत आहे. हे फोटो शेअर करून निकने लिहिले, 'द सिटी ऑफ लव्ह.' तर इतर फोटोजमध्ये दोघे डान्स करताना दिसत आहे. या फोटोजमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. यावेळी प्रियांकाने प्रिंटेड रफेल हाय स्लिट ड्रेस घातला आहे. निकने कॅज्युअल शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. यावेळी दोघे एकमेकांना किस करतानाही दिसले.

The city of love 🇫🇷

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

प्रियांका आणि निकने यापूर्वीही अनेकदा असे पब्लिकली किस केले आहे. प्रियांका आणि निकचे हे फोटोज वेगाने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीची प्रियांका निकसोबत पॅरिसमध्ये फिरताना दिसले होते.

X
COMMENT