आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Was Spotted Crying In The Marriage Of Joe Jonas And Sophie Turner, This Is The Reason Behind Her Crying

दीर जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या लग्नामध्ये रडताना दिसली प्रियांका चोप्रा, हे होते तिच्या रडण्यामागचे कारण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : प्रियांका चोप्राचा दीर जो जोनस आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम अभिनेत्री सोफी टर्नरने नुकतेच फ्रांसमध्ये पुन्हा एकदा लग्न केले आहे. आपल्या दीराच्या लग्नामध्ये प्रियांकाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. प्रियांका अगदी देसी लूकमध्ये होती. तिने पिंक कलरची साडी परिधान केलेली होती आणि त्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या लग्नाचे खूप फोटोज सध्या व्हायरल होत आहेत पण सर्वात जास्त व्हायरल होत आहे प्रियांका चोप्राचा रडतानाचा फोटो. हो, लग्नातील एका फोटोमध्ये प्रियांका चोप्रा रडताना दिसत आहे. 

 

काय होते प्रियांकाच्या रडण्यामागचे कारण... 
झाले असे की, प्रियांका चोप्राने लग्नामध्ये देसी लूक तर केलाच होता. पण मनानेही ती भारतीय असल्याची पावती तिने यावेळी दिली. जो जोनासच्या लग्नाच्यावेळी प्रियांका खूप इमोशनल झाली, कदाचित तिला आपल्या लग्नाची आठवण झाली असावी. फोटोमध्ये प्रियायांक चोप्रा तिचा पती निक जोनाससोबत उभी आहे. प्रियंकाला आपल्या भावना आवरल्या नाहीत आणि ती इमोशनल झाली या फोटोजमध्ये ती डोळे पुसताना दिसत आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka was crying 😭😭😭❤ #jophiewedding

A post shared by Priyanka Chopra Online (@priyankaonline) on