आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Wedding 15 Stylists To Jodhpur For Her Guest 5 And Half KG Mehendi

लग्नात पाहुण्यांनाही परफेक्ट लूक देऊ इच्छिते प्रियांका, बोलावले 15 स्टायलिस्ट, लावण्यात आली 5.5 KG मेंदी, देसी गर्ल म्हणाली - लग्नानंतर पाहुण्यांना घ्यावी लागणार सुटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री प्रियाका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनाससोबत 2 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. हिंदी आणि ख्रिश्चन पद्धतीने दोघांचा साखरपुडा होणार आहे. पीसीच्या लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहेत. बातम्यांनुसार, प्रियांका लग्नात स्वतःलाच नव्हे तर पाहुण्यांनाही परफेक्ट लूकमध्ये बघू इच्छित आहे. याचमुळे तिने 15 स्टायलिस्ट जोधपूरमध्ये बोलावले आहेत. प्रियांकाने कांता मोटवानीची हेअरस्टायलिस्ट म्हणून निवड केली आहे. सर्व स्टायलिस्ट कांता यांच्या टीममधील आहे. 


1 डिसेंबर रोजी लागणार हळद...  
- DainikBhaskar.com सोबत कांता यांनी प्रियांकाच्या लग्नाविषयीच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. कांता म्हणाल्या - 'मी 4 डिसेंबरपर्यंतचा नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंट साइन केला आहे. त्यामुळे मी यासंदर्भात आणखी काही सांगू शकत नाही.' 


साडे पाच किलो मेंदीचा झाला वापर.. 
गुरुवारी प्रियांकाची संगीत आणि मेंदी सेरेमनी झाली. मेंदी सेरेमनीसाठी साडे पाच किलो मेंदीचा उपयोग करम्यात आला. ही मेंदी एक्सपर्ट रमेश अग्रवाल यांच्याकडून मागवण्यात आली होती. रमेश यांनीच ऐश्वर्या रायच्या लग्नात मेंदी पोहोचवली होती. 

- प्रियांकाने व्होग या फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, माझ्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना लग्नानंतर सुटी घ्यावी लागणार आहे. यावरुन तिच्या लग्नात बरीच धमाल होणार असल्याचे समजते. 


आमची मुलगी करणार राज्य...

पीसीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तिचे माजी मॅनेजर चांद मिश्रा जोधपूरमध्ये दाखल झाले आहे. एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले, 'प्रियांंका इतिहास रचत आहे. अनेक स्टार्स भारताबाहेर जाऊन लग्न थाटत आहेत. पण प्रियांका हॉलिवूडमधून येऊन जोधपूरमध्ये लग्न थाटत आहे. तिला स्वप्नातील राजकुमार गवसला असून आमची मुलगी राज्य करणार आहे.' 

 

बातम्या आणखी आहेत...