आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये पुनरागमन : \'द स्काय इज पिंक\'मध्ये चार वेगवेगळ्या भूमिका साकारणार प्रियांका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियांका चोप्रा मागील काही दिवसांपासून हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये दोन्ही जागी सशक्त आणि स्वतंत्रपणे काम करत आहे. 'दिल धडकने दो', 'बाजीराव-मस्तानी', 'जय गंगाजल' असो की अमेरिकन टेलिव्हिजन सिरीज 'क्वांटिको' तिने यात सशक्त भूमिका निवडल्या आहेत. आता ती अडीच वर्षांनंतर 'द स्काय इज पिंक'च्या माध्यमातून हिंदी चित्रपटात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात ती अदिती चौधरीची भूमिका करत आहे. त्या मार्गदर्शक वक्ता आणि लेखक आयशा चौधरीच्या आईची भूमिका करणार आहे. चित्रपटात आयशाची भूमिका 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' फेम अभिनेत्री झायरा वसीम साकारत आहे.


या चित्रपटाची कथा आयशावर आधारित आहे. आयशा जेव्हा 6 महिन्यांची होती तेव्हा बोन मॅरोचे प्रत्यारोपण झाले होते. 13 वर्षांची असताना तिला पल्मोनरी फायब्रोसिससारखा आजार झाला होता. यानंतर आयशाने 'माय लिटिल एपिफेनीज' नावाचे पुस्तक लिहिले होते आणि अनेकदा प्रेरक भाषणदेखील दिले होते. 21 वर्षांच्या वयात तिने जग सोडले. आता तिची आई लोकांना तिच्याविषयी सांगत आहे आणि या आजाराविषयी जागृत करत आहे.

 

या चित्रपटात प्रियांका चोप्रा चार वेगवेगळ्या रूपांत दिसणार असल्याची चर्चा आहे. तिच्या पात्राच्या वयानुसार लूक बदलत जाईल. याविषयी जास्तीची माहिती मिळालेली नाही, मात्र सेटच्या सूत्राच्या मते प्रियांकाच्या लूकवर जास्त लक्ष दिले जात आहे. एका क्रू मेंबरने सांगितले की, प्रियांका या चित्रपटासाठी खूप मेहनत आहे. ती दिवसभर शूटिंग करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...