आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra Wishes Her Mother In Law, Happy Birthday, Wrote In The Caption, 'Happy Birthday Mother In Love'

इंस्टाग्रामवर प्रियांकाने दिल्या सासूबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅप्पी बर्थडे मदर इन लव्ह' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा, निक जोनससोबत लग्न झाल्यानंतर लॉस अंजिलिसला जाऊन स्थायिक झाली आहे. तिने निकच्या कुटुंबियाणांसोबत खूप चांगल्या प्रकारे जुळवून घेतले आहे. एका आदर्श सुनेप्रमाणे प्रियंकाने आपली सासू डेनिस जोनसला त्यांच्या बर्थडेला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

सासूबाईंसाठी प्रियांकाची खास पोस्ट... 
प्रियांकाने इंस्टाग्रामवर सासू डेनिसचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोवर प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हॅप्पी बर्थडे मदर इन लव्ह. खूप सारे प्रेम मम्मा जे. हा दिवस तुमच्यासाठी खूप खास व्हावा.' 

 

निकने दिल्या मॉमला शुभेच्छा... 
प्रियांकाप्रमाणे निकनेदेखील मॉमसोबत फोटो शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी प्रियांका आपला दीर आणि जाऊ जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्या लग्नासाठी पॅरिसला पोहोचली होती. यावेळी संपूर्ण जोनस कुटुंब एकत्र दिसले होते. लग्नानंतर प्रियांका आणि निक हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी इटलीला पोहोचले होते.  

 

'द स्काय इज पिंक'मध्ये दिसणार आहे प्रियांका...  
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर प्रियांका लवकरच बॉलिवूड चित्रपट 'द स्काय इज पिंकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकासोबत फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट याचवर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार आहे.