Bollywood / प्रियांका चोप्राने इंस्टाग्राम पोस्टमध्ये पती निकचे वय लिहिले चुकीचे, यूजर्सने केले ट्रोल

37 वर्षांच्या प्रियांकाने 2018 मध्ये निकसोबत लग्न केले होते

Sep 04,2019 01:22:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा इंस्टाग्रामवर पती निक जोनसचे वय चुकीचे लिहिल्यामुळे ट्रोल केले जात आहे. झाले असे की, अभिनेत्रीने निकसोबत आपला एक फोटो शेअर करून त्याला टकीला ब्रांड विला वनच्या लॉन्चसाठी शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले आहे, "तुझा गर्व आहे. 27 वर्षांच्या वयात तू स्वतःच्या टकीलाचा मालक आहेस." पोस्ट पाहिल्यानंतर अनेक इंस्टा यूजर्सने तिला आठवण करून दिली की, तो 27 नाही तर 26 वर्षांचा आहे.

लोकांनी केल्या अशा कमेंट्स...
एका यूजरने लिहिले आहे, "तो अजून 26 वर्षांचा आहे, 27 चा नाही" आणखी एका यूजरची कमेंट आहे, "14 दिवसांसाठी 26 वर्षांचाच." एका यूजरची कमेंट आहे, "तू त्याला डिजर्व करत नाहीस. तुला त्याचे खरे वयही माहित नाही." एका यूजरने लिहिले, "जेव्हा तू वयातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केलास, तो 26 वर्षांचा आहे."

निकचा जन्म 16 सप्टेंबर 1992 ला झाला होता. या हिशेबाने अजून तो 26 वर्षांचा आहे आणि काही दिवसांनी 27वा वाढदिवसाजरा करणार आहे. 37 वर्षांच्या प्रियांकाने 2018 मध्ये निकसोबत लग्न केले होते

X