Bollywood / सेलेब लाइफ : इंस्टाग्रामवर प्रियांका चोप्राचे 4 कोटी फॉलोवर्स झाले, व्हिडीओ शेयर करून केला आनंद व्यक्त 

दीपिका पेक्षाही पुढे गेली पीसी.... 
 

दिव्य मराठी

May 15,2019 11:41:00 AM IST

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा जोनसच्या इंस्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. ही आनंदाची बातमी फॅन्सला सांगण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी प्रियंकाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंकाने आपल्या चाहत्यांना फ्लाइंग किसेस दिल्या आहेत.

व्हिडिओसोबत शेयर केला मॅसेज...
व्हिडिओसोबत तिने एक मॅसेजदेखील लिहिला आहे. प्रियंकाने लिहिले, 'बिग शूटआउट टू माय इंस्टाफैम. तुम्हाला सर्वांना माझे प्रेम की, तुम्ही माझ्या या प्रवासात सामील झालात.' प्रियांका सोशल मीडियावर सर्वांची चाहती बनत आहे. अशातच जेव्हा ती 72 व्या मेट गालामध्ये पोहोचली होती तेव्हा प्रियांकाचे फोटोज खूप व्हायरल झाले होते. प्रियांकाचे पती निक जोनसचे इंस्टा फॅन फॉलोइंग 2 कोटी आहे.

प्रियांकाची इंस्टाग्राम पोस्ट

दीपिका पेक्षाही पुढे गेली पीसी....
बाजीराव मस्तानीमध्ये प्रियांकाची कोस्टार असलेली दीपिका पदुकोणच्या इंस्टाग्रामवर 3 कोटी 5 लाख फॉलोअर्स आहेत. याव्यतिरिक्त आलिया भट्टचेदेखील इंस्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स आहेत.

दीपिकाची इंस्टाग्राम पोस्ट

@albertaferretti

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

X