आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टी/ न्यूयॉर्कमध्ये प्रियांका चोप्राने दिले ब्रायडल शॉवर, होणारी सासूही राहिली हजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. प्रियांका चोप्राच्या लग्नाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन सुरु झाले आहे. रविवारी रात्री तिने न्यूयॉर्कमध्ये एक ब्रायडल शॉवर पार्टी होस्ट केली, यामध्ये तिचे निवडक फ्रेंड्स हजर होते. प्रियांकाने आपल्या इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून याची माहिती दिली. फोटोमध्ये ती पार्टीसाठी तयार होताना दिसतेय आणि तिने लिहिले की, है-टाउनमध्ये माझ्या फ्रेंड्स. पार्टीचे एक निमित्त, प्री-वेडिंग सेलिब्रेशन. प्रियांका सेलिब्रेशन दरम्यान व्हाइट आउटफिटमध्ये दिसली. 


डिसेंबरमध्ये होणार लग्न 
रिपोर्ट्नुसार 36 वर्षांच्या प्रियांका चोप्राच्या लग्नाचे फंक्शन 29 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत सुरु राहतील. 2 डिसेंबरला जोधपुरच्या मेहरानगढ फोर्टमध्ये ती तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असणा-या निक जोनाससोबत हिंदू पध्दतीने लग्न करेल. या लग्नात बॉलिवूडचे अनेक स्टार्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे.. या वर्षी ऑगस्टमध्ये प्रियांका-निकचा साखरपुडा मुंबईत झाला होता. साखरपुड्याच्या सर्व विधी हिंदू पध्दतीने झाल्या होत्या. या दरम्यान निकचे पालकही उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...