प्रियांका चोप्रा आणि / प्रियांका चोप्रा आणि मधु चोप्राच्या पहिला मराठी चित्रपट 'फायरब्रांड' प्रीमियर 22 फेब्रुवारीला होणार

Feb 07,2019 12:53:00 PM IST

बॉलिवूड डेस्क. प्रियंका चोप्रा आणि तिची आई मधु चोप्राच्या निर्मितीतील पहिला मराठी चित्रपट 'फायरब्रांड'चे प्रीमियर 22 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर होणार आहे. याचा प्रीमियर १९० देशांत दाखवले जाईल. चित्रपटात उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर आणि राजेश्वरी सचदेवसारखे पुरस्कार विजेेते मराठी कलाकार आहेत. याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अरुणा राजे यांनी केले आहे. प्रियंका आणि डॉ. मधू चोप्रा यांचे प्रॉडक्शन हाऊस 'पर्पल पेबल पिक्चर्स'चा हा पहिला डिजिटल प्रकल्प आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर मराठीचा प्रथम परवाना मिळालेला मूळ चित्रपट आहे.


प्रीमियरवर मधु चोप्रा म्हणाल्या
फायरब्रांड एक दमदार पटकथा आहे. शिवाय ती आम्ही प्रतिभाशाली कलाकारांच्या तुकडीसोबत बनवण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून ही कथा लाखो लोकांपर्यंत जाईल, याचा आम्हाला जास्त आनंद होत आहे. शिवाय आम्ही नेटफ्लिक्सचे पार्टनर झाल्यामुळे खुश आहोत.


प्रियंका चोप्रा म्हणाली...,
डिजिटल युगात सध्या कंटेंट बदलला आहे. आज, कथाच सर्वकाही झाली आहे. शिवाय प्रेक्षकांकडे विविध प्रकारचे माध्यम उपलब्ध आहेत. ही कथा दूरवरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारी आहे. मी ही कथा नेटफ्लिक्सवर आणून खुश आहे. जी आपल्याला हवी आहे, अशीच पटकथा मी निवडली आहे. ती नक्कीच लोकांना आवडेल.

X