आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra's New Family Member Sophie's Shares First Photo Of Her Wedding, Wrote 'Mr And Mrs. Jonas'

फर्स्ट फोटो : प्रियांकाची जाऊ सोफीने शेअर केला लग्नाचा पहिला फोटो, लिहिले, 'मिस्टर अँड मिसेस जोनस'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राची जाऊ आणि 'गेम ऑफ थ्रॉन्स' फेम अभिनेत्री सोफी टर्नरने सोशल मीडियावर आपल्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मिस्टर आणि मिसेस जोनस." यामध्ये ती व्हाइट गाउनमध्ये दिसत आहे तर तिचा पती जो जोनसने ब्लॅक टक्सेडो सूट घातला आहे. 

 

सोफीच्या फोटोवर कमेंट करून तिची मोठी जाऊ (जो चा मोठा भाऊ केविनची पत्नी) डॅनियलने लिहिले, "खूपच सुंदर वधू..." तसेच एका मेकअप आर्टिस्टचे कमेंट, "काय चमत्कारिक दिवस होता तो ?"

 

फॅशन डिजायनरनेदेखील शेअर केला फोटो... 
आणखी एक फोटोदेखील सोशल मीडियावर आला आहे, ज्यामध्ये सोफी वधूच्या कपड्यांमध्ये आरश्यासमोर उभी आहे. हा फोटो फ्रेंच फॅशन डिजायनर निकोलस गेस्क्विएरने सोफीला टॅग करून शेअर केला आहे. त्याने लिहिले आहे, "परम सुंदरी."

 

29 जूनला झाले सोफी-जोचे लग्न... 
सोफी आणि जोने 29 जूनला दुसऱ्यांदा दक्षिणी फ्रांसच्या शॅटोमध्ये व्हाइट वेडिंग केली. यापूर्वी त्यांनी 1 मेला लॉस वेगासमध्ये लग्न केले होते. त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सर्वांना हैराण केले होते. वेगासच्या एका चर्चमध्ये अत्यंत सिक्रेट पद्धतीने त्यांनी लग्न केले. 

बातम्या आणखी आहेत...