आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेनमेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकताच आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या या सेलेब्रेशनचे अनेक फोटोज सध्या व्हायरल होत आहेत. त्यातीलच एक फोटो आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. फोटोमध्ये प्रियांका चोप्रा सिगारेट पिताना दिसत आहे. यादरम्यान तिचा पती निक जोनस देखील दिसत आहे. प्रियांका चोप्राला असे करताना पाहून तिच्या फॅन्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर सोशल मीडियावर खूप काही तिच्याविषयी लिहिलेही जातेय.
प्रियांका चोप्रा, निक जोनास आणि प्रियांकाची आई मधू चोप्रादेखील या फोटोमध्ये सिगारेट पिताना दिसत आहे. प्रियांकाचा हा फोटो एका शिपवरील आहे. काही काळापूर्वी प्रियांकाने ट्विट केले होते की, धूम्रपान करणे घातक आहे, पण आता प्रत्यक्ष तिलाच हे करताना पाहून ट्रोलर्सने तिला चांगलेच घेरले आहे. अभिनेत्रीच्या ट्वीटचा फोटो शेअर करून ट्रोलर्स तिला प्रश्न विचारात आहेत. तसेच प्रियनकाचा हा फोटो यामुळेही चर्चेत आहे कारण तिने लग्नापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने स्वतः सांगितले होते की, तिला अस्थमा आहे. तसेच तिचा हा फोटो समोर आल्यानंतर एका ट्रोलरने विचारले, 'हा कोणता अस्थाम आहे, जो केवळ दिवाळीमध्येच होतो.'
प्रियांका चोप्राला असे केले गेले ट्रोल...
@all_iz_wel smoking is awful!! Yuck!!
— PRIYANKA (@priyankachopra) February 6, 2010
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.