आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Chopra's Revelation When The Film Was Replayed, I Was In Tears, Why Did It Happen To Me?

प्रियांका चोप्राचा खुलासा - जेव्हा चित्रपटात रिप्लेस करण्यात आले तेव्हा मी ढाळले होते अश्रू, माझ्यासोबतच असे का घडले- वडिलांना केला होता प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला एकेकाळी अपयशाला तोंड द्यावे लागले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिच्याही वाट्याला संघर्ष आला होता. याचा खुलासा स्वतः प्रियांकाने एका मुलाखतीत केला आहे. करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात चित्रपटातून रिप्लेस करण्यात आल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. पण त्या चित्रपटाच्या नावाचा खुलासा करणे तिने टाळले. चित्रपटातून रिप्लेस करण्यात आल्यानंतर वडिलांकडे जाऊन अश्रू ढाळल्याचेही ती या मुलाखतीत म्हणाली.

मी परिस्थितीशी सामना करण्याचे ठरवले होते...
एका एंटरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत प्रियांका, "मला रिप्लेस करण्यात आले होते. चित्रपटातून रिप्लेस करण्यात आल्याचे मला एकदा माझ्या को-स्टारकडून समजले तर एकदा मी वृत्तपत्रात वाचले होते. त्याचवेळी मी निर्णय घेतला की, परिस्थितीला न घाबरता त्याला सामोरे जायचे. खरं तर त्याकाळी मी थोडी खचले होते, रडत रडत असं माझ्यासोबतच का घडलं असावं, असा प्रश्न मी माझ्या वडिलांना विचारला होता. त्यावेळी आता पुढे तू काय करायचे ठरवले असे त्यांनी मला विचारले होते. त्याच क्षणी मी पुढच्या चित्रपटात स्वतःला सिद्ध करुन चांगले काम करण्याचा निर्णय घेतला. जर एखादा चित्रपट अपयशी ठरला तरीदेखील त्यामध्ये माझे काम उत्कृष्ट झाले याची मला खात्री असते. 

प्रियांकाना सांगितल्यानुसार, इंडस्ट्रीत कधीही कुणाला रिप्लेस केले जाते. कारण येथे पुरुषांना महिलांपेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. आमच्या पिढीला पुढच्या पिढीसाठी हा ट्रेंड बदलावा लागणार आहे.

'द स्काई इज पिंक'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे प्रियांका..
प्रियांका  सध्या तिच्या आगामी 'द स्काई इज पिंक'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट दिवंगत लेखिका आयशा चौधरी यांच्या आयुष्यावर बेतला आहे. प्रियांकाने या चित्रपटात आयशाची आई आदिती चौधरीची भूमिका वठवली आहे. प्रियांकासह या चित्रपटात फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्या मुख्य भूमिका आहेत.