Celebs life / प्रियांका चोप्राचे दीर-भावजई मालदीवमध्ये साजरा करत आहेत हनीमून, जो ने फोटो शेअर लिहिले, 'मला आऩंद झाला.'

29 जून रोजी पार पडला जो-सोफीचा विवाह, निकटवर्तीयांची होती उपस्थिती 
 

दिव्य मराठी

Jul 16,2019 11:14:00 AM IST

हॉलीवूड डेस्क - प्रियांका चोप्राचा दीर जो आणि जाऊ सोफी टर्नर मालदीव येते हनीमून एन्जॉय करत आहेत. कपलने याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. जो ने फोटो-व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'मला आनंद झाला.' यासोबतच त्याने मालदीवच्या लक्झरी बीच रिसॉर्ट सोनेवा फुशीला टॅग केले आहे. तर सोफीने जो चे बीज फोटोज शेअर करत लिहिले,'जन्नत. खरंच ही जादूई जागा आहे.'

29 जून रोजी झाला होता जो-सोफीचा विवाह
जो आणि सोफीने 29 जून रोजी सदर्न फ्रान्सच्या सेरियन्स येथे लग्न केले होते. या समारंभात कौटुंबिक सदस्य आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. जो आणि सोफी यांचा हा दुसरा विवाह होता. यापूर्वी 1 मे रोजी लॉस वेगासच्या एका चर्चमध्ये त्यांनी गुपचुप लग्न केले होते.

X