आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2022 च्या निवडणुकांच्या तयारीला लागा! प्रियंका गांधी वढेरांनी कार्यकर्त्यांना दिले विधनसभा लढवण्याचे संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचाराची धुरा हाती घेणाऱ्या प्रियंका गांधी वढेरा यांनी आता प्रत्यक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. अमेठी दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रियंकांनी आपल्या कार्यकर्त्यांना आता 2022 च्या निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितले आहे. 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत थेट उतरण्याचे संकेत त्यांनी दिले. कार्यकर्त्यांशी प्रियंकांनी साधलेल्या संवादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

#WATCH Priyanka Gandhi Vadra, Congress General Secretary for eastern UP, while interacting with party workers in Amethi's Gauriganj: Tayyari kar rahe ho aap chunaav ki? Iss wale ki nahi, 2022 ke liye? Kar rahe ho? pic.twitter.com/PfuixUIhWk

— ANI UP (@ANINewsUP) March 27, 2019


अमेठीतील स्थानिकांशी बोलताना त्यांनी सुरुवातीला विचारले की काय हालचाली सुरू आहेत. आणि निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे. कार्यकर्त्यांनी उत्तर दिले, तेव्हा मध्येच प्रियंका म्हणाल्या, या निवडणुकीची तयारी नाही 2022 च्या निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे? यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना आपणही निवडणूक लढवणार का अशी विचारणा केली. त्यावर प्रियंका म्हणाल्या, "का नाही पक्षाने सांगितल्यास आवश्य निवडणूक लढवणार आहे. ही निवडणूक देशाला वाचवण्यासाठी आहे. अतिशय महत्वाच्या असलेल्या निवडणुकीचा चांगल्याप्रकारे प्रचार करा, घरो-घरी जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांना खरी परिस्थिती सांगा, त्यांना सांगा की हा राहुल गांधींच्या विजयाचा विषय नाही तर देशाचा विजय राहील." प्रियंका गांधी अमेठी दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेठी हे आपले घर असून सहज या ठिकाणी येत असतो असे त्या म्हणाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...