आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi Destroys UP's Atmosphere: BJP State President Mahendra Pandey's Accusation

प्रियंका गांधी यूपीचे वातावरण बिघडवत आहेत : पांडेंचा आरोप

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • काँग्रेस विनाकारण नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत आहे
  • विधेयक सर्वप्रथम संयुक्त पुरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सादर केले होते - पांडे

बुलंदशहर - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांना विनाकारण बदनाम करत असून राज्यातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी केला आहे. काँग्रेसचे नेते समाजात अराजकता पसरवणाऱ्यांसोबत असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. पांडे म्हणाले की, काँग्रेस विनाकारण नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करत आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, तर नागरिकत्व देण्यासाठी आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक सर्वप्रथम संयुक्त पुरोगामी आघाडीचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सादर केले होते. भाजपने केवळ त्यांचे कार्य पुढे चालवले आहे. प्रियंका गांधी सीएए आणि एनपीआरचा विरोध करणाऱ्यांना पाठिंबा का देत आहेत, असा सवाल पांडे यांनी उपस्थित केला. आंदोलनाच्या दरम्यान हिंसाचार करणाऱ्या, कायद्याचा भंग करणाऱ्यांप्रति गांधी कुटुंबाची सहानुभूती का आहे हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही पांडे म्हणाले. आंदोलकांच्या घरी जाऊन त्यांच्याप्रति सहानुभूती दर्शवणे योग्य आहे का? याचे उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी द्यावे, अशी मागणी पांडेंनी केली. विरोधी पक्ष संभ्रम निर्माण करून देशातील विकासाच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहेत. संपूर्ण देशात अफवा पसरवून आंदोलन केले जात आहे. देशाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात असल्याचे पांडे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या वेळी देशातील जनतेला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे, तीन तलाक, अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचे आश्वासन दिले होते.  त्यामुळे भाजप दिलेले आश्वासन पूर्ण करत अाहे. त्यामुळे त्यात काहीही गैर नाही, अशी टिप्पणीही पांडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...