आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyanka Gandhi Election From Varanasi News In Marathi

वाराणसीतून निवडणूक लढण्यावर प्रियंका म्हणाल्या, मी निवडणूक लढणारच नव्हते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होती, हे वृत्त प्रियंका गांधी यांनी फेटाळून लावले आहे. माझे लक्ष नेहमीच अमेठी आणि रायबरेलीवर राहिले आहे. यात कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
प्रियंका गांधी यांना वाराणसी येथून निवडणूक लढवायची होती. नरेंद्र मोदींचा विजय देशाच्या हिताचा राहणार नाही, असे प्रियंका यांना वाटत होते. प्रियंका यांच्या या प्रस्तावावर कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विचार केला. त्यानंतर प्रियंका यांना निवडणुकीत न उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रियंका निवडणुकीत उतरल्या तर राहुल गांधी कमकुवत होतील, अशी भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते.
परंतु, प्रियंका गांधी यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्या म्हणाल्या आहेत, की मी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असती तर माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याला विरोध केला नसता. मी निवडणुकीत उतरावे असे माझ्या भावाने अनेकदा सांगितले आहे. जर मी अशा स्वरुपाचा निर्णय घेतला असता तर माझी आई, भाऊ, पती यांनी मला मदत केली असती.
कॉंग्रेसने स्थानिक नेते अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रियंका अजय यांना संपर्कात असून त्यांना आपला खासगी मोबाईल क्रमांक दिला आहे. या निवडणुकीत प्रियंका गांधी सक्रीय भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.
वाराणसीच्या निवडणुकीत स्थानिक आणि बाहेरील उमेदवार हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने अजय राय यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मोदी यांच्याविरुद्ध प्रियंका गांधी यांना निवडणुकीत न उतरविण्यामागे अनेक कारणे आहेत. प्रियंका वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदींचे महत्त्व वाढले असते असेही सांगितले जाते.
कॉंग्रेसला भीती होती प्रियंका हरण्याची, वाचा पुढील स्लाईडवर....