आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंका गांधी यांना राहुल यांच्या शेजारचे केबिन, लवकरच हातात घेणार सरचिटणीसपदाची सूत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गांधी-नेहरू घराण्यातील पाचव्या पिढीतील प्रतिनिधी प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अाता त्यांना दिल्लीतील २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात केबिन मिळाली आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शेजारची केबिन त्यांना देण्यात आली आहे. सरचिटणीसपदी असताना राहुल यांना जी केबिन दिली होती, त्या केबिनमध्ये आता प्रियंका बसणार आहेत. राहुल यांच्या शेजारचीच ही केबिन अाहे. राहुल गांधी २००७ मध्ये काँग्रेसेचे सरचिटणीस झाले हाेते. त्यानंतर २०१३ मध्ये उपाध्यक्ष झाले हाेते. 

 

प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाली अाहे. विदेशातून त्या मंगळवारी परत अाल्या. त्यानंतर गुरुवारी लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक हाेणार अाहे. या बैठकीत प्रियंकाही सहभागी हाेणार अाहेत. परंतु त्या सरचिटणीसपदाची सूत्र कधी घेतील, ते अजून निश्चित झालेले नाही. त्यांची केबिन निश्चित करण्यात अाली. या केबिनमध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींसह साेनिया गांधी व राहुल गांधी यांची छायाचित्रे लावली अाहेत. राहुल गांधी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये अध्यक्षपदाची सूत्र घेतली तेव्हा याच खाेलीत प्रवेश केला हाेता. प्रियंका गांधी सूत्र स्वीकारल्यानंतर अापल्या टीमची निवड करतील. काँग्रेसच्या तक्रार निवारण समितीच्या प्रमुख अर्चना दालमिया व महिला काँग्रेसच्या प्रमुख सुष्मिता देव त्यांच्या टीममध्ये असण्याची शक्यता अाहे. २०१४ मधील निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला केवळ २ जागा मिळाल्या हाेत्या. अाता चांगली कामगिरी करण्याचे माेठे अाव्हान प्रियंका गांधी यांच्याकडे अाहे. प्रियंका गांधी यांना मिळालेली केबिन यापूर्वी अनेक नेत्यांना मिळाली हाेती. 

 

राहुल यांची प्रियंका, ज्याेतिरादित्यशी चर्चा 
लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षातील रणनीतिकारांशी राहुल गांधी यांनी मंगळवारी चर्चा केली. या चर्चेत प्रियंका गांधींसह ज्याेतिरादित्य सिंधिया उपस्थित हाेते. या बैठकीत उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. फेब्रुवारी महिन्यात हाेणाऱ्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत तिला अंतिम स्वरूप देण्यात येणार अाहे. 
 

बातम्या आणखी आहेत...