आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Priyanka Gandhi Vadra Attacks Karnataka BJP On Congress JDS HD Kumaraswamy Government Falls

भाजपला एक दिवस आवश्य कळे, की प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही; कर्नाटकच्या राजकारणावर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही हे भाजपला एक दिवस आवश्य कळेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा यांनी दिली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचे सरकार 14 महिन्यांनंतर मंगळवारी कोसळले. त्यावरूनच प्रियंकांनी भाजपवर ट्वीट करून निशाणा साधला आहे. प्रत्येकाला भीती दाखवली जाऊ शकत नाही आणि प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही. भाजपला एक दिवस आवश्य ही गोष्ट लक्षात येईल आणि शेवटी सर्वच खोटारडेपणा उघड होतो असेही प्रियंका म्हणाल्या आहेत. कर्नाटक विधानसभेत मंगळवारी झालेल्या बहुमत चाचणीत सरकारच्या पक्षात 99 आणि विरोधात 105 मते पडली होती.


राहुल गांधी म्हणाले, हा कर्नाटकच्या जनतेचा पराभव
तत्पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सरकार कोसळल्यानंतर एक ट्वीट केले होते. त्यामध्ये राहुल म्हणाले, "पहिल्याच दिवसापासून काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार बाहेरून आणि आतूनही स्वार्थापोटी निशाण्यावर ठेवत होते. त्यांना हे सरकार आपल्या सत्तेच्या मार्गातील अडथळा वाटत होते. त्यांच्याच लालसेचा आज विजय झाला आणि खऱ्या अर्थाने लोकशाही आणि कर्नाटकची जनता पराभूत झाली."


भाजपचा पलटवार...
कर्नाटक भाजपने सोशल मीडियावरूनच राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. भाजपने लिहिले, की "पुन्हा एकदा राहुल यांच्या म्हणण्याला काहीच अर्थ निघाला नाही. कदाचित लोकशाहीच्या चापटाचा हा परिणाम आहे. सत्तेवर ताबा ठेवण्यात आपल्या नैराश्याचा अंत झाला आहे. तुमच्या नापाक आघाडीवर हा कर्नाटकचा विजय आहे. लोकशाहीच जिंकली आणि लोकांच्या मतांचा आज सन्मान झाला."

बातम्या आणखी आहेत...