आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादातून हत्या झालेल्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना प्रियंका गांधींचा ताफा अडवला, पोलिसांनी गेस्ट हाउसमध्ये केले रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी(उत्तर प्रदेश)- काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी शुक्रवारी येथील एका हॉस्पीटलमध्ये सोनभद्र हत्याकांडात जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली. त्यानंतर त्या बाय रोड सोनभद्रकडे रवाना झाल्या, पण त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या ताफ्लाया नारायणपूर(मिर्जापूर)मध्ये थांबवण्यात आले. त्यानंतर प्रियंका रस्त्यावरच धरणे आंदोलन केले. त्या म्हणाल्या की, मला फक्त चार जणांसोबतच पीडित कुटुंबाला भेटायचे आहे. मला थांबवणे आणि अटक करण्यासाठी पोलिसांना वरुण ऑर्डर देण्यात आली आहे.


त्यानंतर पोलिसांनी प्रियंका आणि काही नेत्यांना सरकारी गाडीत बसवून गेस्ट हाउसमध्ये घेऊन गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रियंका यांना अटक केलेली नाहीये. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सोनभद्रमध्ये कलम 144 लागू केली आहे. येथील घोरावल परिसरात 17 जुलैला जमिनीच्या वादातून 10 जणांची गोळी मारून हत्या झाली होती. यात पोलिसांनी मुख्य आरोपी सरपंच यज्ञदत्त भोर्तियासहित 27 जणांना अटक केली आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार सुसाट
सोनभद्रला जाताना प्रियंकांच्या ताफ्याला वाराणसीजवळच थांबवण्यात आले. त्यानंतर त्या धरण्यावर बसल्या. प्रियंकांनी याआधी ट्रॉमा सेंटरमधून निघताना मीडियाशी बोलताना सांगितले होते की, उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था राखली जात नाही. येथील गुन्हेगार सुसाट आहेत, त्यांना सरकारची भीती राहिली नाहीये. 


प्रियंका गांधींनी योगी अदित्यनाथांना पत्र लिहीले
गुरुवारी प्रियंकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहीले. त्यात त्यांनी लिहीले की, राज्यातील दौऱ्या दरम्यान दिलेल्या सुरक्षेचे कौतुक करते, पण या सुरक्षेमुळे जनतेला होणाऱ्या त्रासामुले दुखी आहे. जनतेची सेवक असल्यामुळे माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये. 

बातम्या आणखी आहेत...